गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करताना पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत गणेशमूर्ती कार्यशाळा, व्याख्यानमाला व व्याख्यानमाला पुस्तक छपाई या उपक्रमांवरील खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत ganeshowatsav rajya mahotsav 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करताना पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत गणेशमूर्ती कार्यशाळा, व्याख्यानमाला व व्याख्यानमाला पुस्तक छपाई या उपक्रमांवरील खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत ganeshowatsav rajya mahotsav

वाचा:

१) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ /(ई-११४४०९५)/सां.का.२, दि.२०.०६.२०२५

२) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.११४/(ई-१२५५४१२)/सां.का.२, दि.१४.०८.२०२५

३) संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे क्र. पुलदे/गणेशोत्सव /२०२६/जा.क्र.९१३, दि.१५.०७.२०२६

४) संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे क्र. पुलदे/२०२६ / गणेशोत्सव/जा.क्र.९३८, दि.२०.०७.२०२६

प्रस्तावना:-

गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये प्रतिवर्षी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. राज्यात गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करणारे उपक्रम उदा. विविध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करणे. महाराष्ट्रात शिकणाऱ्या परदेशातील तसेच अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे इ. उपक्रमांसह गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” साजरा करण्यास येतो.

राज्यात गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करणारे उपक्रम राबविण्यात येतात. त्या अनुषंगाने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने संदर्भ क्र.३ व ४ येथील पत्रांन्वये अकादमीमार्फत राज्यातील विविध ५ जिल्हयांमध्ये एक दिवसीय गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करणे, तीन दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करुन, त्याकरिता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि ऐतिहासिक

विषयांवरील तज्ञांची दररोज सायंकाळी व्याख्याने आयोजित करणे व ही व्याख्याने अकादमीच्या अधिकृत YouTube वाहिनीवरून विनामूल्य थेट प्रसारित करणे. तसेच व्याख्यानांची पुस्तिका मर्यादित मुद्रित प्रतींसह ई-बुक स्वरूपातही उपलब्ध देणे इ. उपक्रम राबविण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत विनंती केली आहे. त्यानुसार या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णयः-

राज्यात गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करताना पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मार्फत विविध ५ जिल्हयांमध्ये एक दिवसाची गणेशमूर्ती कार्यशाळा व तीन दिवसांची व्याख्यानमाला आणि व्याख्यानमाला पुस्तक छपाई या उपक्रमांवरील होणाऱ्या खर्चास रु.१४,००,०००/- इतक्या रकमेच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या बाबनिहाय अंदाजित खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-

२. सदर व्याख्यानमालेचे चित्रीकरण https://www.youtube.com/@pldmka या संकेत स्थळावर उपलब्ध राहील. तसेच इ-पुस्तिका https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलवर उपलब्ध असेल

३. यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक “झेडडी-०२, २२०५ कला व संस्कृती (१०१) ललित कला शिक्षण (०७) कला अकादमी (०७) (०१) पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (२२०५ १४६३) ५० इतर खर्च (अनिवार्य)” या लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदातून भागविण्यात यावा.

४. संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांना यासाठी नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून, त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास यासंबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

५. सदर कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांनी शासनास विहित वेळेत सादर करावे.

६. सदर शासन निर्णय वित्त विभाग क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग दोन, दिनांक १७एप्रिल २०१५ वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला, उप विभाग तीन, अ.क्र. नियम २७ (२) (अ) नुसार प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकाराच्या अधिन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

७. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२६०८०३१७११३३८६४३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment