राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत special teacher certificate
महोदय,
मा. मुख्यमंत्री सचिवालयाचे दिनांक १५.०९.२०२६ रोजीचे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.
२. दि. ०३.०९.२०२६ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांनी “राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करावे” अशी महत्वाची घोषणा केली आहे.
३. तरी, उपरोक्त पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्याची कार्यवाही यथाशीघ्र करण्यात यावी. तसेच याबाबतचा कार्यपूर्ती अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, ही विनंती.










