डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ मुदतवाढीबाबत diploma in education online addmission
संदर्भ : १) परिषदेचे पत्र क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण/प्रवेश कक्ष/२०२६-२७/१८६३०७८, दि.२४/०४/२०२६
२) राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती सभा दि.१३/०८/२०२१ चे इतिवृत्त
३) या संचालक यांची मान्य टिपणी -११
४) परिषदेचे पत्र क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण/प्रवेश कक्ष/२०२६-२७/१८८५९१३, दि.०८/०५/२०२६
५) परिषदेचे पत्र क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण/प्रवेश कक्ष/२०२६-२७/१८८५८५९, दि.०८/०५/२०२६
६) प्राचार्य, बी. आर आंबेडकर यांचे पत्र क्र.१८२/डी.टी. एड/२०२६, दि.१६/०५/२०२६
७) प्राचार्य, एस. एम. जोशी अध्यापक विद्यालय नाशिक यांचे पत्र क्र. २३/२०२६-२७, दि.१८/०५/२०२६
८) कु. पल्लवी विश्वास सोमण या विद्यार्थीनीचा अर्ज दि. १५/०५/२०२६ (प्राप्त दि. १८/०५/२०२६)
उपरोक्त संदर्भ क्र.२ चे मान्य इतिवृत्तानुसार व संदर्भ क्र. ३ अन्वये ज्या अध्यापक विद्यालयांनी संदर्भ क्र. १ अन्वये विहित मुदतीत नोंदणी केली नाही अशा अध्यापक विद्यालयाची विलंब शुल्कासह नोंदणी करणेसाठीची मुदत दि.२२/०५/२०२६ रोजी संपुष्टात आलेली आहे.
संदर्भीय पत्र क्र.४ व ५ अन्वये निर्देशित केलेप्रमाणे सन २०२६-२७ मधील डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया दि.११/०५/२०२६ पासून सुरु झालेली असून ऑनलाईन अर्ज सादर करणेची मुदत दि. २५/०५/२०२६ पर्यंत देण्यात आलेली होती.
तथापि उपरोक्त संदर्भ क्र.६ ते ८ अन्वये संबंधितांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करणेसाठी मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे. प्राप्त विनंती अर्जानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करणेसाठी दि.०१/०६/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फेरीनिहाय शासकीय व व्यवस्थापन कोट्याचे सुधारित वेळापत्रक सोबत संलग्न केलेले आहे.
प्रवेशप्रक्रियेसंबंधीच्या सर्व सूचना संदर्भीय पत्र क्र.४ व ५ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. करिता सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात संबंधितांनी विहित मुदतीत कार्यवाही करावी. तसेच याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील अध्यापक विद्यालयांना अवगत करावे.
सोबत – सुधारित प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (शासकीय व व्यवस्थापन कोटा)









