उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा जून-जुलै २०२६ चे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे गुण भरणेसाठीची मुदतवाढ देणेबाबत higher secondary certificate
संदर्भ- या कार्यालयाचे पत्र क. रा.मं./परीक्षा-२/२५०५ दिनांक १५/०६/२०२६
उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, संदर्भीय पत्रान्वये जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे गुण ऑनलाईन पध्दतीने दिनांक १६/०६/२०२६ ते दिनांक ०८/०७/२०२६ या कालावधीमध्ये मंडळाकडे जमा करावयाचे होते. परंतु अद्याप काही उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडून प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे ऑनलाईन गुण भरलेले नाहीत असे निदर्शनास आले आहे.
तरी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे गुण भरणेसाठी गुरुवार दिनांक ०९/०७/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी.
सदर बाब आपल्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.
(मा. अध्यक्ष यांच्या मान्यतेने)









