मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत maratha reservation circular
महाराष्ट्र शासन कृषी विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: कृषिवि-३७२६/प्र.क्र.१५३/ई-१८९८५७३/७-से
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई – ४०० ०३२.
दिनांक : २०.११.२०२६.
संदर्भ :
१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१२९/(ई.१५५८६०६)/आरक्षण-५, दि.०५.०६.२०२६.
२) अवर सचिव, मराठा आरक्षण कक्ष (सामान्य प्रशासन विभाग), यांचे पत्र क्र. बैठक- २०२५/प्र.क्र.७४/ मआक, दि.१५.१०.२०२६.
प्रस्तावना :-
सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अनुज्ञेय करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये, मा. मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) तथा अध्यक्ष, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमिती यांच्या अध्यक्षतेखाली, दि.१४.१०.२०२६ रोजी झालेल्या बैठकीत, इतर मागास प्रवर्गास असलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा अधिकचे शिक्षण शुल्क मराठा विद्यार्थ्यांकडून न घेणेबाबत तसेच, सदर शिक्षण शुल्क न भरल्यामुळे प्रवेश प्रक्रियेस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता घेणेबाबत, सर्व संबंधित विभागांनी आपल्या अधिनस्त शिक्षण संस्था/ महाविद्यालये यांना आवश्यक त्या सूचना / निर्देश देण्याबाबत तसेच, सदर निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण संस्था / महाविद्यालये यांच्याविरूध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुषंगाने, राज्यातील चारही कृषि विद्यापीठातंर्गतच्या कृषि व कृषि संलग्न महाविद्यालयातील, इतर मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेले, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्कांचे लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील चारही कृषि विद्यापीठातंर्गतच्या कृषि व कृषि संलग्न महाविद्यालयातील, इतर मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेले, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या प्रवेश पुस्तिकेत नमूद करण्यात आलेले १. प्रवेश शुल्क २. विद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निधी/कल्याण निधी ३. कॉलेज मॅगेजीन फी ४. विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी ५. ग्रंथालय शुल्क ६. विद्यापीठ अश्वमेध निधी ७. जिमखाना शुल्क ८. नोंदणी शुल्क ९. विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी १०. विद्यार्थी ओळखपत्र शुल्क हे इतर शुल्क, यांचा लाभ मराठा समाजाच्या पात्र विद्यार्थ्यांना देखील अनुज्ञेय करण्यास शासन मंजुरी देत आहे.
२. सदर लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देय करण्याकरिता काटेकोरपणे निकषांची तपासणी करुन, अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विद्यापीठांनी घ्यावी. तसेच, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी याबाबत आवश्यक समन्वय करावा.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२६११२०१४४९०९४१४६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

PRATIBHA MADHAV PATIL
(प्रतिभा पाटील) उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१. सचिव, कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
३. वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
४. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर,
५. कुलगुरु/कुलसचिव / नियंत्रक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.
६. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.
७. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
८. सहायक लेखाधिकारी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
९. सहायक लेखाधिकारी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.
१०. सहायक लेखाधिकारी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
११. सहायक लेखाधिकारी, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
१२. उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली, जि. रत्नागिरी.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, अहिल्यानगर /उपकोषागार अधिकारी, राहुरी, जि. अहिल्यानगर,
१४. जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी/उपकोषागार अधिकारी, दापोली, जि. रत्नागिरी.
१५. जिल्हा कोषागार अधिकारी, अकोला/उपकोषागार अधिकारी, अकोला, जिल्हा अकोला.
१६. जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी/उपकोषागार अधिकारी, परभणी, जिल्हा परभणी.
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
१८. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१९. उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ) स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
२०. अवर सचिव/ कक्ष अधिकारी (का.६-जे/२-अ), कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२१. कार्यासन ७-जे (निवडनस्ती).










