आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील (प्राथमिक शिक्षक / माध्यमिक शिक्षक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक) पदे “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरविण्याबाबत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील (प्राथमिक शिक्षक / माध्यमिक शिक्षक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक) पदे “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरविण्याबाबत

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. MTD-३६०२४/७९/२०२५-MTD (Desk१५)

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२. दिनांकः ०९ जून, २०२६.

वाचाः

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५ / प्र. क्र. १४९ /टीएनटी-१, दिनांक २३/०६/२०१७.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५ / प्र. क्र. १४९ /टीएनटी-१, दिनांक २०/०६/२०१८.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५ / प्र. क्र. १४९ /टीएनटी-१, दिनांक ०७/०२/२०१९.

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०१८ /प्र. क्र. ३९७ /टीएनटी-१ दिनांक २५/०२/२०१९.

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२ / प्र. क्र. १०६ /टीएनटी-१, दिनांक १०/११/२०२२.

६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३ / प्र. क्र. ५०९ /टीएनटी-१, दिनांक १३/१०/२०२३.

७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अधिसूचना क्र. संकीर्ण- २०२३/प्र. क्र. ३०२ / टीएनटी-१, दिनांक १२/०२/२०२५.

८) शासन पत्र क्रमांक MTD-३६०२४/७९-२०२५-MTD (Desk-१५), दिनांक १२/१/२०२६.

९) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५ / प्र. क्र. ९३३ (१) /टीएनटी-१, दिनांक २०/०१/२०२६.

१०) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५ / प्र. क्र. ९३३ (२) /टीएनटी-१, दिनांक २०/०१/२०२६.

११) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. संकीर्ण-२०२५ / प्र. क्र. ९३३ (१) / टीएनटी-१, दिनांक ०२/०४/२०२६.

१२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय बीसीसी-२०२३/प्र. क्र. ५४ / आरक्षण-५ दिनांक ११/०२/२०२६.

प्रस्तावनाः

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ अन्वये राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करतांना सर्व उमेदवरांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती “अभियोग्यता बुद्धीमत्ता चाचणी” उच्चतम गुण प्राप्त उमेदवारामंधून “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे निवड करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली असून, सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे.

२. आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक पदावर निवड करतांना सर्व पात्र उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होऊन, शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यादृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक २३/०६/२०१७ व दिनांक ०७/०२/२०१९ अन्वये लागू करण्यात आलेल्या “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३. उपरोक्त शासन निर्णयांतील तरतुदी व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयांच्या धर्तीवर शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे, सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

२. शिक्षक संवर्गातील पदभरती कार्यपद्धतीः

१) शासकीय आश्रमशाळेवर आकृतीबंधानुसार शिक्षक संवर्गाच्या मंजूर पदांपैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करुन, संबंधित अपर आयुक्त त्यांच्या विभागातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करतील.

२) सर्व शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदुनामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संबंधित उप आयुक्त, अपर आयुक्त

प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. यामध्ये शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागांच्या पदांचा देखील समावेश असेल. उमेदवारास यापैकी त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त १०० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.

८) संबंधित अपर आयुक्त निवडसूचीतील उमेदवारांच्या सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करतील. (शालान्त / उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी /पदविका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता) Non Creamy Layer प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता परीक्षा (इ.१ ली ते ८ वी करीता) / अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण (महिला / दिव्यांग / खेळाडू इ.) इत्यादी), त्या-त्या प्रवर्गात आवश्यक असलेल्या इतर सर्व कागदपत्रांची तपासणी करतील व पात्र उमेदवारांना आदेश देतील. पदभरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी खालील समिती करेल.

९) नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे, त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्यांच्या सेवा त्वरीत समाप्त करण्यात येतील.

१०) नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे छाननीअंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल. त्यानुसार, उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल. यासंदर्भात उमेदवाराचा आक्षेप असल्यास तो सात दिवसांच्या आत पवित्र प्रणालीवर असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप संबंधित अपर आयुक्त यांना प्रणालीवर दिसेल. संबंधित अपर आयुक्त सात दिवसांच्या आत त्यावर निर्णय घेतील.

११) छाननीअंती मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना अपर आयुक्त सात दिवसांच्या कालावधीत ई-मेलद्वारे तसेच नोंदणीकृत डाकेने नियुक्तीपत्र पाठवतील.

१२) उमेदवाराने नियुक्ती पत्रास सात दिवसांच्या आत स्विकृती कळविणे बंधनकारक राहील. अशी स्विकृती दिल्यानंतर अपर आयुक्त यांनी संबंधितांना नियुक्ती आदेश देतील. संबंधित प्रकल्प अधिकारी त्या उमेदवारास रुजू करुन घेतील व तसा रुजू अहवाल अपर आयुक्त यांना सादर करतील. उमदेवारास नियुक्ती आदेश दिल्यानंतर पवित्र पोर्टलवरील पुढील बाबींची आवश्यक ऑनलाईन प्रक्रीया ही अपर आयुक्त यांनी पूर्ण करणे बंधनकारक राहील, जेणेकरुन पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रीया पूर्ण झाल्याचे विभागाच्या निदर्शनास येईल.

इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायीक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र १२ वी विज्ञान किंवा बी.ए./ एम.ए. इंग्रजी किंवा बी. एस्सी / एम. एस्सी. अशी अर्हता धारण केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा असेल.

९. शासकीय आश्रमशाळावंरील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास “नोडल अधिकारी” म्हणून काम पाहतील. त्यानुषंगाने, ते शिक्षण आयुक्त /शिक्षण संचालक, पुणे यांच्याशी समन्वय साधून यासंदर्भातील सर्व कामकाज पाहतील. आयुक्त, आदिवासी विकास यांनी राज्यातील सर्व संबंधित अपर आयुक्त यांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र Login (User name, Password) देण्याबाबत कार्यवाही करावी.

१०. शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे. तसेच, सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने वरील मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपद्धतीप्रमाणे संबंधित आयुक्त, आदिवासी विकास व संबंधित अपर आयुक्त यांनी कार्यवाही करावी.

११. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक निवडीसाठी “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीसंदर्भात, भविष्यात वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय / परिपत्रक / नियम / तरतुदी / सुधारणा शासकीय आश्रमशाळांवरील शिक्षक निवडीसाठी लागू राहतील.

१२. सदरहू शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

१३. सदरहू शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक सांकेताक २०२६०६०९१८११०३५६२४ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment