राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत shala opening day
संदर्भ :- १) शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४, दि. २०/०४/२०२३
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२६/उन्हाळी सुट्टी/एस-१/१७७६३११, दि.२८/०३/२०२६
3) Shri. S.V. Kolhe, Assistant Government Pleader, High Court, Nagpur (ई-मेलद्वारे प्राप्त)
४) मा. आयुक्त (शिक्षण) यांचेशी झालेली चर्चा.
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत संदर्भक्र. २ अन्वये राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.
विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत Writ Petition No.-४०६७/२०२६ filed by Maharashtra Rajya Prathamik Shikshan Samiti, Pune and Others VS. The Sate of Maharashtra and Others दाखल झालेली आहे.
त्यानुषंगाने कळविण्यात येते की, अद्यापही विदर्भातील तापमान हे विद्यार्थ्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक २२ जून, २०२६ पासून सुरू होतील. तसेच दि. २२ जून २०२६ ते ३० जून, २०२६ या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरतील व दि. ०१ जुलै २०२६ पासून शाळा नियमित वेळेत भरतील.
उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दि १५ जून, २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होतील याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी.

![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)







