प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) फेब्रुवारी 2027 करीता माहिती संकलन प्रपत्रातील माहिती अद्ययावत करणेबाबत scolarship exam paripatrak
संदर्भ :- 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. प्राउशि/प्र.क्र.23/2025 (ई-1142170)/एसडी-5,
दि. 17/10/2025.
2. ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. जिसेफ-2026/प्र.क्र.39/वित्त-3, दि. 25/06/2026.
3. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2026/3623, दि. 25/08/2026.
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, संदर्भीय शासन निर्णयान्वये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) ही दि. 21/02/2027 रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. सदर परीक्षेच्या पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी आपल्या कार्यालयाची तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी, मनपा कार्यालयाची प्राथमिक माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी सन 2026 च्या परीक्षेसाठी आपणास देण्यात आलेल्या लॉगीनमध्ये Officer’s Information 2027 हा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
सदर पर्यायात मागील वर्षाची आपली, आपल्या जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी, मनपा यांची माहिती दर्शविण्यात आली आहे. त्यामध्ये काही बदल असल्यास View या बटनावर क्लिक करून दि. 24/09/2026 ते 30/09/2026 या कालावधीत संदर्भ क्र. 2 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सेस फंड / मनपा निधीतून शुल्क भरणा करणेबाबत तसेच इतर माहितीत आवश्यक तो बदल करून माहिती अद्ययावत करावी. जेणेकरुन आपणास सन 2027 च्या परीक्षेकरीता ऑनलाईन लॉगीन उपलब्ध करुन देता येईल.
अद्ययावत करावयाची माहिती :-
1. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ बृहन्मुंबई, मनपा), शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, (दक्षिण / पश्चिम / उत्तर)
2. सर्व गटशिक्षणाधिकारी.
3. सर्व प्रशासन अधिकारी,
4. जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून शुल्क भरणा करणेबाबत (संदर्भ क्र. 2 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार)









