वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत varishtha vetan shreni training 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत varishtha vetan shreni training 

संदर्भ:- 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र. 43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१

2. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक राप्रभो २०२५/ प्र.क्र. २६ / प्रशिक्षण दि

०९.०८.२०२५

उपरोक्त संदर्भ दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

सदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल चिकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्रार) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही कराची (नोंदणीचाचतवा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)

१) प्रशिक्षणाच्या नाव नींदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.

२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

तथापि काही शिक्षक, मुख्याध्यापक हे दिनांक ०१.०५.२०२६ ते ३०.०४.२०२७ या कालावधीत १२ वर्षे २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत फक्त असे शिक्षकः मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात,

४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.

६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

गट क्र. १- प्राथमिक गट (इ.१ली ते ४ थी, इ.१ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ.१ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)

गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)

गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)

गट क्र. ४. अध्यापक विद्यालय गट

मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.

७) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी.

८) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.

९) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ ID. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांकडे शालार्थ आयडी उपलब्ध आहे. त्यांनी तो आयडी वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणाच्यर्थ्यांनी जो आयडी वापरून नोंदणी केली आहे त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पात्र केले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत केलेला कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही व प्रशिक्षण शुल्क परत केले जाणार नाही.

१०) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या मोवाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्म OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.

११) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (बरिष्ठ व निवड) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात,

१२) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती www.man.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत,

१३) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.

१४) इंटरनेट बैंकिंग/ क्रेडीट/ डेबिट कार्ड/UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे, जेणे करून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुबार शुल्क परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

१५) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.

१६) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी, प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थीना लागू राहतील याची नोंद घ्यावी.

१७) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल,

१८) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेबाबी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१९) नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून

gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय.डी. वर संपर्क करावा.

२०) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.mau.ac.in हे संकेत स्थळ पाहावे.

२१) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.

२२) पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोर्टल दररोज रात्री ११.०० ते ०१.०० या कालवधीत बंद राहील.

२३) संदर्भ क्रमांक एक व दोनच्या शासन निर्णयानुसार सदर प्रशिक्षण हे शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये.

२४) आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक, ४२२००२, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे, उच्च्च शिक्षण संचलनालय, पुणे मनपा, बृहन्मुंबई मनपा, नागपूर मनपा या विभागांचा API / offline data उपलब्ध न झाल्याने या विभागांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

अभिनव भोसले – विषय सहाय्यक संपर्क क्रमांक ८२०८८७९१५९ (कार्यालयीन वेळेत – सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ पर्यंत) तांत्रिक सहाय्य (Trifind Pvt. Ltd.) – संपर्क क्रमांक – ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळेत – सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ पर्यंत).

Related posts:

Leave a Comment