नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना फॉर्म नं – ६ pdf स्वरूपात उपलब्ध new voter registration form pdf available 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना फॉर्म नं – ६ pdf स्वरूपात उपलब्ध new voter registration form pdf available 

नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना फॉर्म नं – ६ pdf स्वरूपात उपलब्ध pdf download 

अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना

नमुना-६

१. साधारण सूचना :

(अ) अर्जदार ज्या लोकसभा विधानसभा मतदार संघामध्ये सर्वसाधारण रहिवाशी असेल त्या मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला उद्देशून अर्ज करण्यात येईल. जर अर्जदारास विधानसभा/लोकसभेचा क्रमांक आणि नाव माहित नसेल किंवा त्याविषयी शंका असेल तर, मतदार नोंदणी अधिकाऱ्याने मदत करावी आणि विधानसभा/लोकसभेचा क्रमांक नमूद केला नाही या कारणांसाठी अर्ज नाकारला जाणार नाही.

(ब) अर्जदाराने अर्जातील नोंदी इंग्रजी मध्ये किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत कराव्यात आणि हे अर्ज नाकारण्याचे कारण असणार नाही.

(क) सेनादलातील व्यक्ती शांत क्षेत्रात कार्यरत असताना त्या ठिकाणच्या मतदार यादीत सर्वसाधारण मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करावयाचा असल्यास, अशा व्यक्तीचे नाव इतर कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत सेवादलातील मतदार किंवा विधानसभा मतदारसंघात सामान्य मतदार म्हणून नोंद झालेली नाही, याची खातरजमा करण्यात यावी.

*(ड) फोटो समोरच्या बाजूने संपूर्ण चेहरा दिसेल असे, नजीकच्या काळातील पांढऱ्या पार्श्वभूमीवरील सही नसलेले पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र (४.५ सेंमी. x ३.५ सेंमी.) चिकटवावे. डोळे उघडे असावे आणि चेहऱ्याच्या दोन्ही कड्या स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत.

पोहोचते करण्यात येईल.

(इ) मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीक) नोंदणीनंतर, अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर मतदार ओळखपत्र योग्य पोच पावतीसह विनाशुल्क शीघ्र डाकेने

२. बाब (१) *(नाव) : राज्याच्या अधिकृत भाषेत आणि इंग्रजीत अचूक नाव, अचूक स्पेलिंग सह लिहावे. जर नाव एकाच भाषेत लिहिले तर प्रणाली द्वारे दुसऱ्या भाषेत जसेच्या तसे भाषांतर केले जाईल ज्यात स्पेलिंगच्या चुका होण्याची शक्यता आहे.

३. बाब (२अ) आणि (२ब) (नातेवाईकाचे नाव आणि आडनाव) विवाहित स्त्री अर्जादाराच्या बाबतीत, पतीचे नाव प्राधान्याने नमूद करावे. (रकान्यामधील

लागू नसलेला विकल्प खोडावा)

४. बाष (५) (आधार तपशील) तपशिलाच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी आधार क्रमांक नमूद करण्यात यावा. जर अर्जदाराकडे आधार क्रमांक नसेल

तर ५ (ब) समोरील रकान्यात तसे नमूद करावे.

५. बाब (६) (लिंग) :

*(अ) पुरुष / स्त्री/ तृतीयपंथी याकरिता दिलेल्या योग्य चौकटीत, लिंग स्पष्टपणे चिन्हांकित करावे.

(ब) तृतीयपंथी अर्जदार त्यांचे लिंग “पुरुष”, “स्त्री” किंवा “तृतीयपंथी” असे नमूद करू शकतात.

६. बाब (७) (अ) (ब) (जन्मतारीख):

*(अ) अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वप्रमाणित प्रत वयाचा दाखला म्हणून जोडण्यात यावी. अर्जात नमूद केलेली कागदपत्र

जोडल्यास नोंदणी जलद होईल आणि तत्पर सेवा दिली जाईल.

(ब) अर्जात नमूद केलेला जन्म दाखल्याचा कोणताही दस्ताऐवज उपलब्ध नसल्यास, अर्जदाराने वयाचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे सादर आवश्यक आहे आणि अशा कागदपत्राचे नाव अर्जातील “घोषणापत्र” भागात बाब क्रमांक ७ (ii) आणि (iv) मध्ये नमुद करण्यात यावी. याबाबतीत मतदाराला मतदार नोंदणी अधिकारी किंवा त्याची पडताळणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यासमोर व्यक्तिशः उपस्थित रहावे लागेल.

७. बाब (८) (सध्याचे सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण):

*(अ) अर्जदार / पालक / जोडीदार यांच्या नावे असलेला सर्वसाधारण रहिवाशी असल्याबाबतचा पुरावा म्हणून जोडण्यात आलेला अर्जात नमूद असलेल्या कोणत्याही एका कागदपत्राची स्वप्रमाणित प्रतीसह संपूर्ण टपाल पत्ता पिन क्रमांकासहीत नमूद करावा.

(ब) छपरामध्ये / पदपथावर राहणाऱ्या बेघर भारतीय नागरिक तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांकडे सर्वसाधारण रहिवासाचा कागदपत्र पुरावा नसल्यास, अन्यथा जे नोंदणीसाठी पात्र असल्यास प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल.

(क) जे विद्यार्थी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यास पात्र आहेत त्यांची नोंदणी त्यांचे पालक राहत असलेल्या ठिकाणी किंवा ते ज्या वसतिगृहात किंवा भोजनालयात राहत असतील तेथे करता येऊ शकेल.

८. घोषणापत्र : ” घोषणापत्र” या भागातील सर्वच नोंदी सर्वच बाबतीत अनिवार्यपणे पूर्ण कराव्यात. या अर्जासंदर्भात” घोषणापत्रातील ” कुठलीही नोंद चुकीची आढळल्यास किंवा चुकीची असल्यास किंवा बरोबर नसल्यास, त्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार (१९५० चे ४३) दंडाची तरतूद आहे आणि एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात कृपया याची नोंद घेणे.

Related posts:

Leave a Comment