राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) कार्ड काढणेबाबत ayushyaman bharat yojana
संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक वैखप्र-१६२५/ (१४९/२५)/ टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.
२. प्रस्तूत कार्यालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/टि-७/आयुष्यमान/६१५७ दिनांक ०५/०३/२०२६.
ABHA
Ayushman BHARAT Health Account CARD CREAT & DOWNLOAD LINK
https://abha.abdm.gov.in/abha/v3/register/aadhaar
उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली होती.
तथापि, याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वोना अवगत करण्यात यावे असे कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्य अध्दती तसेच व्हिडीयो लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैदयकीय प्रतिपूर्तीचे देयक स्विकारले जाणार नाही.
आबा (ABHA – आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड हे तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी एक १४ अंकी ओळखपत्र आहे. तुम्ही हे कार्ड ऑनलाइन (मोबाईल/कॉम्प्युटर) किंवा ऑफलाइन (रुग्णालय/CSC केंद्र) अत्यंत सोप्या पद्धतीने मोफत काढू शकता.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियाः
अधिकृत संकेतस्थळः नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या ABHA नोंदणी पोर्टलवर जा。
Create ABHA Number: मुख्य पानावर ‘Create ABHA Number’ हा पर्याय निवडा,
आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सः नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करा,
ओटीपी पडताळणीः तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP (One Time Password) टाका.
आभा अॅड्रेस (ABHA Address) तयार कराः तुमचे नाव किंवा पसंतीचा युझरनेम टाका,
कार्ड डाउनलोडः यशस्वी नोंदणीनंतर तुमचे १४ अंकी आभा कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
ऑफलाइन नोंदणी प्रक्रियाः
जर तुमच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सब्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊ शकता. तिथे तुमचे आधार कार्ड आणि ओळखपत्र दाखवून संबंधित कर्मचारी तुम्हाला आभा कार्ड तयार करून देतील.
टीप: हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य नसले, तरीही ते असल्यास नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी होते.









