दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळांमधील रिक्त व अनुज्ञेय पदे भरणेकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करणेबाबत disability vishesh shala paripatrak
दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळांमधील रिक्त व अनुज्ञेय पदे भरणेकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या अनुषंगाने पुढील नमुद मुद्दयांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी:-
i) महसूल विभागनिहाय, जिल्हानिहाय, उपक्रमनिहाय, कर्मचारी संवर्गनिहाय सविस्तर माहिती (सोबत जोडलेली Google Sheet)
ii) दिव्यांगांच्या सर्व उपक्रमांचा नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक व नूतनीकरण प्रमाणपत्र
iii) विशेष शाळा/कार्यशाळांमधील UDISE प्रमाणित विद्यार्थी संख्या
iv) बंद पडलेल्या शाळा/कार्यशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळानिहाय संख्या
संवर्गनिहाय कर्मचारी v) जिल्हानिहाय, शाळा/कार्यशाळानिहाय व समायोजनाची सद्यस्थिती, प्रत्यक्ष हजर झालेले कर्मचारी, हजर करण्यास नकार दिलेल्या संस्था
vi) याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे रद्द केलेल्या संस्था व त्यामधील कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती
vii) सदर अनुदानित संस्थांमधून अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची जिल्हानिहाय व संवर्गनिहाय संख्या
viii) दिनांक १७.११.२०२५ रोजीच्या आदेशान्वये अनोंदणीकृत करण्यात आलेल्या ३१६ संस्थांमधील अनुदानित संस्थांची संख्या
ix) दिनांक १७.११.२०२५ रोजीच्या आदेशाविरूद्ध विविध उच्च न्यायालयात दाखल प्रकरणांची संख्या
x) उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या प्रकरणांची संख्या व त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या
xi) विद्यार्थी मंजूर पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळानिहाय संख्या
xii) रिट पिटीशन क्र. १७५१८/२०२५ व अन्य १० न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दिनांक २३.१२.२०२५ व दिनांक ३०.०३.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार केलेली कार्यवाही
xiii) सदर कार्यवाही पूर्ण झाली किंवा कसे?
उपरोक्तप्रमाणे जिल्हानिहाय, प्रवर्गनिहाय, शाळा / कार्यशाळानिहाय, कर्मचारी संवर्ग निहाय, माहिती संकलित करून, सदर माहिती Excel sheet मध्ये तयार करावी. यासाठी पोर्टलसंदर्भात कामकाज करणारी यंत्रणा वापरावी.
वरीलप्रमाणे राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा यांचा एकत्रित DATA तयार करुन शासनास ३० दिवसांत सादर करावा.
सोबत :- Google link
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEJDgBm4x९२hhHtgQpn8BMo
४८६२५-eLywLXsXb८३b८J२acHw/viewform










