दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ मधील तरतूदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबत badlisandrbhat circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ मधील तरतूदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबत badlisandrbhat circular

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांकः मविआ २०२३/प्र.क्र.६०/का.१२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक

मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२

तारीखः २६ ऑगस्ट, २०२५

वाचा :-

१. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६.

२. भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे दि.०८.१०.२०१८ चे कार्यालयीन ज्ञापन

प्रस्तावना :-

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या कलम २० (५) अन्वये असे विहित करण्यात आले आहे की, शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांबाबत सुयोग्य शासन धोरण आखू शकेल. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या परिशिष्टामध्ये “निर्दिष्ट दिव्यांगत्व” याची व्याख्या करण्यात आली आहे, त्यानुसार भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दि.०८.१०.२०१८ च्या कार्यालयीन ज्ञापनाव्दारे ज्या कर्मचाऱ्यांचे अवलंबित कुटुंब सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत, अशा काळजीवाहक कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सूट देण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रवर्गात मोडणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी व ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अवलंबित सदस्य असे निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात सूचना देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :-

राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी/कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा/मुलगी/आई-वडील/वैवाहिक जोडीदार/भाऊ बहिण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत व ज्यांच्याकडे त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आहे, त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय आणि पदाची रिक्तता या बाबींचा सारासार विचार करुन सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत विचार करतील.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८२६१४५२०६४२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

LEENA ASHISH SANKHE

LAASHISH SANKHE

(लिना संखे) उप सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,

३. सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

४. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,

५. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई

६. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना),

त्यांनी हे आदेश त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभागप्रमुख / प्रादेशिक विभागप्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावे.

७. “प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

८. ‘प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

९. ‘प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

१०. *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

११. “सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,

१२. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद) मुंबई,

१३. “सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,

१४. *सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,

१५. आयुक्त, दिव्यांग कल्याण

१६. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.

१७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई ४०० ०३२.

१८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

१९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

२०. मुख्य लेखापरीक्षक (निवासी लेखे), कोंकण भवन, नवी मुंबई,

२१. सर्व विभागीय आयुक्त

२२. सर्व जिल्हाधिकारी

२३. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

२४. निवडनस्ती.

Related posts:

Leave a Comment