वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ अनुपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेबाबत varishtha vetan nivad shreni training circular
संदर्भ :
– १) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण, दि.२०/०७/२०२१
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.६७/प्रशिक्षण, दि.०६/१०/२०२१
उपरोक्त संदर्भीय विषयात नमूद केल्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य यांना देण्यात येणाऱ्या वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दिनांक १३/११/२०२६ ते दिनांक २२/११/२०२६ या कालावधीत राज्यातील विविध केंद्रावर सुरु झाले आहे. सदर प्रशिक्षणास काही अपरिहार्य कारणाने अनुपस्थित व काही कारणाने प्रशिक्षणातून बाहेर झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत होणाऱ्या (मे-जून २०२७) प्रशिक्षणामध्ये विनामुल्य प्रशिक्षणाची एक संधी उपलब्ध करून दिली जाईल. अशा सूचना आपल्या स्तरावरून सर्व संबधिताना देण्यात याव्यात











