सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत परिपत्रक tambakhu mukta shala paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत परिपत्रक tambakhu mukta shala paripatrak 

तंबाखूमुक्त शाळा अभियान शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

परिपत्रक :-

महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात व मुलांना तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी ३० जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसोबत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था हा कार्यक्रम सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थेने राबविला आहे. तसेच सदर संस्था गेल्या पाच वर्षापासून व्यसनमुक्तीचे कार्य करीत असून सदर संस्थेस महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान केलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्गत येणाऱ्या शाळांमध्ये तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविण्याबाबत सलाम मुंबई फाउंडेशन यांनी प्रस्ताव शासनास सादर केला असून सदर संस्था हे अभियान राबविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार आहे. त्यानुसार विभागांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविणेबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस काढावी. सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना ही नोटीस वाचून दाखवावी. सदर नोटीसची एक प्रत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा दर्शनीय ठिकाणी लावावी.

२) शाळेत नियंत्रण समितीची स्थापना करावी आणि समितीच्या मासिक बैठका आयोजित कराव्यात. वेगळी समिती बनविणे शक्य नसल्यास शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेच्या निकषांच्या पूर्ततेचा आढावा घेत रहावा आणि त्याचे निर्णय आणि अहवाल संग्रहीत करावेत. ३) धुम्रपान आणि तंबाखू निषिध्द क्षेत्र शालेय परिसरात धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे

गुन्हा आहे असे पक्के फलक शाळेत महत्वाच्या ठिकाणी लावणे.

४) तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती व्हावी यासाठी शाळेत पोस्टर्स, घोषणापट्ट्या आणि नियम लावणे. (तंबाखूमुक्त शाळा/परिसर ह्यावर विद्याथ्यर्थ्यांसाठी चर्चासत्र/पथनाट्य/समूहगान /निबंध स्पर्धेचे आयोजन करावे.

५) तंबाखू विरोधी संदेश शैक्षणिक संस्थेच्या स्टेशनरीवर लिहिणे/चिकटवणे, सदर पोस्टर्स, घोषणापट्ट्या, नियम आणि संदेश हे विद्यार्थ्याकडून तयार करून घ्याव्यात आणि प्रत्येक वर्गावर्गात लावावेत.

६) मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यालयात तंबाखू नियंत्रण कायदा, २००३ आणि अध्यादेश ह्यांची प्रत ठेवावी. कायद्याची प्रत बेबसाईटवर उपलब्ध आहे.

७) तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त राज्य सल्लागार प्रतिनिधी, मुंबई/प्राथमिक आरोग्य केंद्र/खाजगी दवाखाना/इंडियन डेन्टीस्ट असोसिएशनचे सदस्य यांची तंबाखूमुक्त शाळेसाठी पत्र लिहून मदत घेणे,

८) शाळेने नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाना, डेन्टिस्ट, इंडियन डेन्टिस्ट असोसिएशनचे सदस्य यापैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास बोलावून शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम, कॅन्सरची लक्षणे या विषयांवर एक सत्र आणि आरोग्य/मुख तपासणी असे उपक्रम आयोजित करावे.

९) शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर पूर्णतः बंदी असणे. सदर संदर्भात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फलक लावावा.

१०) शाळेत जे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी तंबाखू नियंत्रणासाठी हिरिरीने कार्य करीत आहेत, त्यांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्र/ग्रीटींगकार्ड/पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करावा.

११) वरील सर्व निकष पूर्ण झाल्यावर शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तंबाखूमुक्त शाळा किंवा तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था परिसर असा फलक लावावा. शाळेचे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसमोर शाळा तंबाखूमुक्त असल्याचे घोषित करावे.

२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्याबाबत आवश्यक त्या सुचना संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात याव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१९०६०६१६१२०७४८२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तंबाखूमुक्त शाळा अभियान शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

Related posts:

Leave a Comment