राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वीच्या वर्गातील VIKSIT BHARAT अंतर्गत BUILDATHON 2025 अभियान राबविणेबाबत viksit bharat buildathon paripatrak
संदर्भ :- १. केंद्र शासनाच्या दिनांक ३०.०९.२०२५ रोजीच्या व्ही. सी. मधील सूचना.
२. संचालनालयाचे पत्र क्रमांक ४८२५, दिनांक ०१/१०/२०२५.
३. मा.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे
पत्र जा.क्र.मप्राशिप/सशि/एटीएल/२०२५-२६/२९९६ दि.०६/१०/२०२५
४. श्री. धीरज साहू (भा.प्र.से.) अपर सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण
मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.डी.ओ.नं.४-३/२०२५एटीएल दि.१६/१०/२०२५
५. केंद्र शासनाच्या दिनांक २७/१०/२०२५ रोजीच्या व्ही. सी. मधील सूचना.
६. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आस्था-क/टे.क.प्राथ/वि.भा./२०२५/१५०८६२६ दि.२८/१०/२०२५.
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये केंद्रशासनामार्फत शिक्षण मंत्रालय व अटल इनोव्हेशन मिशन यांचा संयुक्त उपक्रम विकसित भारत या अभियान राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गातील प्रत्येक विद्याध्योंने विकसित भारत अंतर्गत BUILDATHON 2025 साठी नवे विचार मांडणेविषयी तसेच VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहे. अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी सदरील अभियानामध्ये प्रकल्प सादरीकरणासाठी दिनांक १३ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी सादरीकरणे २ मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या व्हिडिओच्या सादरीकरण अधिकृत पोर्टलवर करावयाचे आहे याची नोंद घ्यावी. असे सूचित करण्यात आलेले होते.
. VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अंतर्गत Atmanirbhar Bharat, Swadeshi, Vocal for Local, and Samriddh Bharat या चार संकल्पनांवर आधारित आहे.
२. अभियानामध्ये ५ ते ७ विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. सदरील विद्यार्थी इयत्ता ६ वी ते १२
वीच्या वर्गातील असावेत.
३. सदरील स्पर्धा २ प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.
४. 1. Idea Submission: कल्पना (२ मिनिटांचे लघु व्हिडिओ)
2. Prototype Submission: प्रोटोटाईप/मॉडेल (व्हिडिओ स्वरूपात)
व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी जगातील वास्तव आव्हानांवर मात करण्यासाठी विविध संकल्पना सूचवाव्यात.
५. व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी फिजिकल व डिजीटल बाबत काम करण्यासाठी आपल्या संकल्पना सूचवाव्यात.
६. सदरील अभियानामध्ये शिक्षकांनी आपल्या शाळेतील अभियानामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नोंदणी व प्रकल्प अपलोड मदत, विद्याथ्यर्थ्यांना थीम समजावणे,
७. सदरील अभियानामध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्याध्यर्थ्यांना अभियानामध्ये प्रोत्साहन देणे, नोंदणी/प्रकल्प सादरीकरण मार्गदर्शन करणे, स्पर्धा व उपक्रम आयोजित करणे.
८. VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढीसह अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर, २०२५ देण्यात आलेली आहे. याची विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.
९. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आपल्या जिल्हयातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना सदरील अभियान १०० टक्के शाळांनी नोंदणी सहभाग करणेसाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना सूचना देणे, सहभागाचे निरीक्षण करणे, प्रचार उपक्रम राबविणे,
१०. सदरील अभियानामध्ये जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
११. अभियानामध्ये पुढीलप्रमाणे टप्पे देण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी.
> २३ सप्टेंबर, २०२५ ते ०६ ऑक्टोबर, २०२५ नोंदणी
> १३ ऑक्टोबर, २०२५ Live Innovation Event
> १३ ऑक्टोबर, २०२५३१ ऑक्टोबर, २०२५ प्रकल्प नोंदणी व सादरीकरण.
> नोव्हेंबर-डिसेंबर मूल्यमापन
➤ जानेवारी २०२६ निकाल व विजेत्यांचा सत्कार
१२. मूल्यमापन निकष-
* कल्पनेची नवीनता व मौलिकता
* विस्तारक्षमता व उपयुक्तता
* शाश्वतता व सामाजिक परिणाम
*प्रत्यक्षात अंमलबजावणीची शक्यता
Atmanirbhar Bharat, Swadeshi, Vocal for tocal, and Samriddh Bharat या चार संकल्पनांशी सुसंगतता.
राष्ट्रीय स्तरावर १० विजेते तसेच राज्यस्तरावर १०० विजेते घोषित केले जाणार आहेत.
आज दिनांक २८/१०/२०२५ रोजीपर्यंतची सद्यः स्थिती खालील तक्त्यात नमूद करण्यात आली आहे.
संदर्भ क्रमांक ५ रोजीच्या व्ही.सी. व्दारे सूचित केल्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये नोंदणी करून सहभागी झालेल्या इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थी, शिक्षक, तसेच शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांचे प्राचार्य यांनी आपले सादरीकरणे पोर्टलवर सादर करणेसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांचा व्ही.सी. व्दारे आपल्या विभागाचा दररोज
आढावा घ्यावा. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांनी आपल्या जिल्हयातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांचा व्ही.सी. व्दारे दररोज आढावा घेण्यात यावा.
केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक ४ च्या पत्रामध्ये नमूद सदरील अभियानामध्ये प्रकल्प सादरीकरणासाठी दिनांक १३ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी सादरीकरणे २ मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या व्हिडिओच्या स्वरूपात खालील अधिकृत पोर्टलवर अपलोड करावेत. सदरचे कामकाज १०० टक्के दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.
अधिकृत पोर्टल- https://vbb.mic.gov.in](https://vbb.mic.gov.in
शासन परिपत्रक येथे पहा pdf download











1 thought on “राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वीच्या वर्गातील VIKSIT BHARAT अंतर्गत BUILDATHON 2025 अभियान राबविणेबाबत viksit bharat buildathon paripatrak ”