वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत varishtha nivad shreni vetan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत varishtha nivad shreni vetan 

संदर्भः या कार्यालयाचे पत्र जा.क्र. रानैसंप्रप / सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२६/५० दि.१२ में २०२६

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र असणाऱ्या व प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षण नियोजनाबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आलेले होते. या प्रशिक्षणासाठी पात्र असणा‌ऱ्या व पुडीन शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणा‌ऱ्या शिक्षकांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दि.२ जून २०२६ ते १२ जून २०२६ या कालावधीमध्ये विभागस्तरीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण स्तरावर नियोजित आहे. उर्वरित पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण नोव्हें. २०२६ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत नियोजित असल्याचे संदर्भीय पत्रानुसार यापूर्वी कळविण्यात आलेले आहे.

प्रशिक्षणास पात्र असल्यामुळे पोर्टलवर नोंदणी केलेल्या मात्र पुढील शैक्षणिक वर्षात सेवानिवृत होणाऱ्या काही शिक्षकांना जनगणना / बीएलओ या राष्ट्रीय कामाचे कार्यदिश असल्याचे समजते. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र असणाऱ्या, पोर्टलवर नोंदणी केलेल्या व पुढील शैक्षणिक वर्षात सेवा निवृत्त होणाऱ्या मात्र जनगणना/बीएलओ इ. कार्याचे आदेश असणान्या शिक्षकांना (शालेय शिक्षण, उज्ज शिक्षण, आदिवासी विकास, समाज कल्याण, बहुजन कल्याण इ. विभाग) या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे असल्यास संबंधितानी त्यांचे जनगणना / बीएलओ इ. राष्ट्रीय काम दि. २ जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्याबाबत आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे. जेणेकरून संबंधितांना सदरहू प्रशिक्षणात सहभागी होणे सुलभ होईल, ही बाब सर्व संबधित शिक्षकांच्या निदर्शनास आणावी.

(नोंदणी केलेल्या उर्वरित पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत प्रस्तावित असून त्याचे नियोजन स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)

Related posts:

Leave a Comment