जून-जुलै २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या एकत्रित गुणपत्रिका व प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत ssc hsc certificate
प्रकटन
विषय : जून-जुलै २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या एकत्रित गुणपत्रिका व प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १४ जुलै, २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने जून-जुलै २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधीत विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांना गुरुवार दि. २३/०७/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार असून सर्व माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आलेले आहे.
यासंदर्भात विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित प्राचार्य / विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी.











