“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीबाबत shikshak abhiyogyata buddhimatta test
नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना
“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीबाबत.
१. उमेदवारांचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमधील नोंदीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (७५%), शैक्षणिक (७%) व व्यावसायिक (८%) अर्हतेचे या प्रमाणे ९०% गुणांचे गुणांकन पोर्टलमधील नोंदीनुसार प्रणालीमध्ये Auto Calculate करण्यात येते. तर उर्वरित मुलाखत (५%) व अध्यापन कौशल्य (५%) अशा एकूण १० % गुणांची नोंद संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर नोंद करण्यात येते. उमेदवारांची अंतिम निवड एकूण १०० गुणांच्या आधारे करण्यात येते. त्यामुळे उमेदवारांच्या स्व- प्रमाणपत्रातील नोंदी अचूक असणे आवश्यक आहे.
२. तथापि, काही उमेदवारांकडून गुणपत्रिका/प्रमाणपत्र यामध्ये नमूद केलेली श्रेणीची नोंद स्व-प्रमाणपत्रामध्ये चुकीची केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कागपत्र पडताळणी करताना उमेदवाराची पोर्टलवर नोंद केलेली श्रेणी व प्रत्यक्षात गुणपत्रक / प्रमाणपत्र यामध्ये असलेल्या नोंदी तपासून खात्री करून घ्यावी. सबब गुणांकनासाठी आवश्यक अर्हतेच्या नोंदी चुकीच्या नोंद झाल्या असतील तर योग्य मूल्यमापन होण्यासाठी संबंधित व्यवस्थापनाने पुराव्यासह पवित्र प्रणालीच्या edupavitra२०२५@gmail.com या ई-मेल वर तत्काळ ई-मेल करावेत, जेणेकरून उमेदवारांचे योग्य मुल्यमापन करून निवड प्रक्रिया पूर्ण करता येईल. कोणत्याही परिस्थतीतीत चुकीची नोंद दुर्लक्षित करू नये.
३. व्यवस्थापनांना काही अडचणी आल्यास edupavitra२०२५@gmail.com या email वर संपर्क साधता येईल.











