एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत anganvadi protsahan bhatta circular
महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांकः- एबावि-२०२५/प्र.क्र.३१/का-६
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: २३ नोव्हेंबर, २०२६.
१) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२४/प्र.क्र.१३१/का.६, दि.०४/१०/२०२४.
संदर्भ :-
२) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचे पत्र क्र. एबाविसेयो/का-३ /२९४०/२०२५-२६, दिनांक ११ जून, २०२५.
३) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२५/प्र.क्र.३१/का.६, दि.२४ जून, २०२५.
४) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचे पत्र जा.क्र. एबाविसेयो/का-३/४४०१/२०२६-२७, नवी मुंबई, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२६.
प्रस्तावना:-
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. प्रोत्साहन भत्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत मा. मंत्री, महिला व बाल विकास यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार, सदर समितीच्या मान्यतेने संदर्भाधिन क्र. (१) येथील शासन निर्णयानुसार विहित केलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये संदर्भाधिन क्र. (३) येथील दि.२४.०६.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सदर निकषांमध्ये सुधारणा करणेबाबत होत असलेल्या मागणीस अनुसरून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी संदर्भाधिन क्र. (४) येथील दि.१४.१०.२०२६ रोजीच्या पत्रान्वये अहवाल सादर केला होता. त्यानुषंगाने, मा. मंत्री (महिला व बाल विकास) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या दि.२८.१०.२०२६ रोजीच्या बैठकीमध्ये यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरीता संदर्भाधिन क्र.३ येथील शासन निर्णय, दि.२४.०६.२०२५ अन्वये विहित करण्यात आलेले निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करणेसाठी अंगणवाडी केंद्रांकरीता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यात येत असून त्याआधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रांचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे. तदनुषंगाने उपरोक्त नमूद १० निकषांपैकी किमान ७ निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रचलित कार्यपध्दतीनुसार म्हणजेच खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील.

३. सदर शासन निर्णयातील प्रोत्साहन भत्त्याचे निकष माहे नोव्हेंबर, २०२६ पासून लागू करण्यात येत असून यापूर्वीच्या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करणेसाठी सदर शासन निर्णयातील निकष लागू न करता तत्कालीन निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
४. सदरहू आदेश मा. मंत्रिमंडळाने दि.३० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मा.मंत्री, महिला व बाल विकास यांचे अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित
करण्यात येत आहेत.
५. वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने याप्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्र.एक्स-१, २२३६-पोषण आहार ०२-पोषक अन्न व पेये यांचे वितरण, १०१-विशेष पोषण आहार कार्यक्रम, (०८) (०५) अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा १००% (२२३६ १९४५) ०२-मजूरी या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणा-या तरतुदीमधून भागविण्यात यावा.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६११२३१५०१११२५३० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
VILAS RAMDAS
THAKUR
(वि. रा. ठाकूर)
सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई,
२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३) मा. उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण व नगरविकास) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
४) मा. उपमुख्यमंत्री (उत्पादन शुल्क व क्रीडा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५) मा. मंत्री / मा. राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
६) सर्व मा. मंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
७) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
पृष्ठ ४ पैकी ३
शासन निर्णय क्रमांक एबावि-२०२५/प्र.क्र.३१/का.६
८) सचिव, (महिला व बाल विकास विभाग), मंत्रालय, मुंबई,
९) अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई,
१०) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई,
११) आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे,
१२) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
१३) सर्व जिल्हाधिकारी,
१४) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद),
१५) सर्व विभागीय उपायुक्त (महिला व बाल विकास),
शासन परिपत्रक येथे पहा pdf download










