सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत saralseva promotion paripatrak
महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्रमांकः इएसटी-२०२६/प्र.क्र.ई.१८०८०३७/प्रशा-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक :- २४ ऑगस्ट, २०२६
वाचाः- सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२९०/ कार्या.१२, दिनांक १९ नोव्हेंबर, २०१६
प्रस्तावना :-
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या सरळसेवेने, पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने नेमणूका/पदस्थापना करताना संबंधीत प्रकरणे कोणत्या स्तरापर्यंत सादर करावी व कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १९ नोव्हेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच, गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड पदाकरिता संबंधित विभागाचे सचिव/विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख हे नियुक्ती प्राधिकारी असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तथापि पदनिहाय नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत स्वतंत्र्य आदेश प्रशासकीय विभागने निर्गमित करावेत, असे देखील उपरोक्त शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यासन प्रशासन-४ यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
कार्यासन प्रशासन-४ यांच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने, पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने नेमणूका/पदस्थापना करताना संबंधीत प्रकरणी कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत याकरिता या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी निश्चित करण्यात येत आहेत :-
०२. वरील नियुक्ती प्राधिकारी हे सरळसेवेने, पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणुका/पदस्थापनेच्या प्रकरणांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी असतील. मात्र बदली करण्यासंदर्भात बदली अधिनियमान्वये घोषित केलेले सक्षम प्राधिकारी अंतिम निर्णय घेतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८२४१२२२४४२७१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.










