राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजनेंतर्गत राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे मासिक अंशदान PRAN खाती जमा करावयाची सुधारीत कार्यपध्दती pran account paripatrak
वाचा:
– १) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो १००५/१२६/सेवा-४, दि.३१.१०.२००५.
२) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो २०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दि.२७.०८.२०१४.
) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-२०१५/ (NPS)/प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६.०४.२०१५.
३ ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, दि.०४.१२.२०२३.
५) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. सेनिवे-२०२४/प्र.क्र.५४/सेवा-४, दि.२०.०९.२०२४.
प्रस्तावना :
उपरोक्त नमूद संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू केली आहे. संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला असून, दि.१ एप्रिल २०१५ पासून सदर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील स्तर-१ ची राज्यांतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे संदर्भ क्र.४ च्या शासन परिपत्रकान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी, आहरण व संवितरण अधिकारी आणि कोषागार अधिकारी यांच्या स्तरावर पार पाडावयाच्या कार्यवाहीची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, आणि संदर्भ क्र. ५ च्या शासन निर्णयान्वये, केंद्र सरकारने दिनांक २४.०८.२०२४ रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्तिवेतन योजना (Unified Pension Scheme) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासन परिपत्रक दिनांक ०४.१२.२०२३ सोबतच्या परिशिष्ट अ मधील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदान कर्मचाऱ्यांच्या PRAN खाती जमा होण्याकरीता वेतन देयकावर कार्यवाही करण्याच्या कालमर्यादसंदर्भात सविस्तर कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :-
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या प्रान खाती जमा होण्यासाठी सुधारीत कार्यपध्दती पुढीलप्रमाणे असेल व त्यानुसार सुधारीत परिशिष्ट- अ खालीलप्रमाणे आहे.
२. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रान खाती जमा होण्यासाठी सुधारीत कार्यपध्दतीनुसार खालीलप्रमाणे विकसन करण्यात आले आहे.
i. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन देयके प्राधान्याने पारित करुन त्याचे प्रदान ई-कुबेर प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात पुढील महिन्याच्या ०१ तारीख अथवा देय दिनांक “Not payable before the first day of the next month or due date” असा शेरा नोंदवून प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत प्रमाणक क्रमांक (Voucher No.) संस्करीत करण्यासाठी Treasury Net प्रणालीमध्ये विकसन करण्यात आले आहे.
ii.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत नियोक्त्याच्या (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत १४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत १०%) अंशदानाचे देयक तसेच कर्मचाऱ्याच्या व नियोक्त्याच्या अंशदानाच्या (राष्ट्रीय निवृत्तिवेतन
प्रणाली अंतर्गत २४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत २०%) रकमेच्या देयकांचे E-Bill बाबत सेवार्थ प्रणालीमध्ये विकसन करण्यात आले आहे. महालेखापाल कार्यालयाच्या निर्देशानुसार ई-व्हाऊचर निर्धारीत केलेल्या कालावधीपर्यंत जतन करणे व लेखापरिक्षण /न्यायालयीन प्रकरण / माहिती अधिकार प्रकरणी मागविल्यास सादर करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत २४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत २०%) कोषागार कार्यालयांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या खात्यात (DDO Account) ला जमा न करता थेट ई-कुबेर प्रणालीद्वारे विश्वस्त बँकेत (Trustee Bank) वर्ग करण्याबाबत सेवार्थ प्रणाली व TreasuryNet प्रणाली मध्ये विकसन करण्यात आले आहे.
सर्व आहरण व संवितरण अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी तसेच अधिदान व लेखा अधिकारी यांनी उपरोक्त सुधारीत कार्यपध्दतीनुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रान खाती जमा करण्याची कार्यवाही करावी.
सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.५८/२०२६/को.प्र.४, दि.११.०६.२०२६ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आले आहे.
हा शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२६०६१११७०३५०२३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
प्रति,
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
शासन परिपत्रक येथे पहा pdf download










