राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अधिकारी/कर्मचारी यांचे सन २०२६-२७ या वर्षातील प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता निधी मंजूरीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत व निधी वितरणाबाबत prashikshan prashikshan circular
महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र.क्र.४७/ई- १८५७४७७/प्रशिक्षण
शालेय शिक्षण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: ३ नोव्हेंबर, २०२६
१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. टीआरएन-०९/प्र.क्र.३९/०९/१२-अ, दि. २३.०९.२०११
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. टिसीएम-२०१३/(७१/१३)/प्रशिक्षण, दि. २९.०१.२०१४
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. राप्रधो-४२१५/ (३८/१५)/प्रशिक्षण, दि. २४.०७.२०१७
४) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. टीआरएन-२०२३/प्र.क्र.६६/२३/१२-अ, दि. २७ सप्टेंबर, २०२३
५) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थस-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि. ९.०४.२०२६
६) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंप्रपम/साव्यावि/प्रशिक्षण/२०२६-२७ दि.१२ जून, २०२६
प्रस्तावना:-
राज्य प्रशिक्षण धोरण, २०११ अंतर्गत शालेय शिक्षण विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता सन २०२६-२७ वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या पायाभूत, पदोन्नतीनंतरचे व उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमास मान्यता देण्याची तसेच त्याकरिता झालेल्या खर्चाच्या अनुषंगाने रु. ५९,५४,८५०/- इतकी तरतूद उपलब्ध करण्याची विनंती संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी संदर्भाधिन क्र. ६ येथील पत्रान्वये केली होती. शालेय शिक्षण विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षणासाठी सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षांमध्ये रु. १००.०० लक्ष तरतूद मंजूर आहे. संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, संदर्भ क्र. ४ शासन निर्णयान्वये प्रशिक्षण शुल्कात वाढ करण्यात आली
आहे. त्यानुसार सन २०२६-२७ वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या पायाभूत, पदोन्नतीनंतरचे व उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमास मुळ अर्थसंकल्पित तरतूदीपैकी ४० टक्केच्या मर्यादेत निधी वितरणासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यानुषंगाने शालेय शिक्षण विभागातील व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता सन २०२६-२७ वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या पायाभूत, पदोन्नती नंतरचे व उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमास झालेला खर्च/संभाव्य खर्च भागवण्यासाठी निधी मंजूरीस प्रशासकीय मान्यता देण्याची व निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णयः-
राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्यातील अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता सन २०२६-२७ या वर्षामध्ये राबविलेल्या व राबविण्यात येणाऱ्या (पायाभूत/पदोन्नतीनंतरचे/उजळणी) प्रशिक्षण कार्यक्रमास झालेला खर्च व संभाव्य खर्चासाठी रू. ४०,००,०००/- (अक्षरी-रू. चाळीस लाख फक्त) इतका निधी मंजूरीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. तसेच, सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा झालेला खर्च व संभाव्य खर्चासाठी ४०,००,०००/- (अक्षरी रू. चाळीस लाख फक्त) इतका निधी वितरीत करण्यास खालील अटीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे.
1. सन २०२५-२६ या अर्थिक वर्षातील अखर्चित निधी रु. १७,२८,५४३/- च्या अनुषंगाने त्रुटीची पूर्तता करून सदर निधी तात्काळ समर्पित करण्यात यावा.
II. ज्या कारणासाठी निधी मागणी केली आहे त्याच कारणासाठी खर्च करण्यात यावा.
IV.
वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वरील निधी खर्च करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर वितरीत निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच सदर खर्चाचा अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादींची माहिती शासनास पाठवावी.
२. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
३. उपरोक्त खर्च मागणी क्र. ई-३, २२५१, सचिवालयीन सामाजिक सेवा, ००३ प्रशिक्षण, (००) (০০) (০৭) शासकीय कर्मचा-यांना प्रशिक्षण (कार्यक्रम) २२५१ १००२ या लेखाशीर्षाखालील ५०, इतर खर्च उदिष्टाखाली मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.
४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६३२/२०२६/व्यय-५, दि. ०८/१०/२०२६ अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६११०३१५१८२५२०४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
प्रत-
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by MOHINUDDIN B TASHILDAR Date: 2026.11.03 15:20:31 +05’30’
(मो. बा. ताशिलदार) उप सचिव, महाराष्ट्र शासन
१. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. प्रधान सचिव (शालेय शिक्षण), मंत्रालय, मुंबई,
४. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र शासन, पुणे,
५. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे,
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र (१/२), मुंबई/नागपूर,
७. महालेखापाल (लेखा परिक्षा), १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
९. वित्त विभाग (व्यय-५/अर्थसंकल्प-८), मंत्रालय, मुंबई,
१०. अर्थसंकल्प कार्यासन, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. निवडनस्ती (प्रशिक्षण).










