थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत सन २०२५-२६ मुदतवाढ thakit vetan deyak
संदर्भ-
१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७. २) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१
३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.
४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.
५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४.
६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक-१२/९/२०२४.
७) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२५/टि-७/थकीत/ऑनलाईन /०५३६९ दिनांक-१९/११/२०२५.
सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डिडिओ? (मुख्याध्यापक) शाळा स्तर यांना दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतू अद्यापही बहुतांश शिक्षक कर्मचा-यांचे थकीत देयके शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर होऊ शकलेली नाही. यासाठी वेतन पथक कार्यालय व विविध संघटनांकडून सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे.
सबब डीडीओ-१ (मुख्याध्यापक) शाळा स्तरावरुन थकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक १०/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ
देण्यात येत आहे, त्यानंतर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.
तसेच शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देवकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये ऑनलाईन सादर करावे. प्रस्तावासोवत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा.
वर नमूद कालमर्यादा तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या मविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे.









