मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण, 2026 – महत्वाच्या सूचना matdar yadhya instructions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण, 2026 – महत्वाच्या सूचना matdar yadhya instructions

महोदय/महोदया,

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 14 में 2026 च्या पत्रानुसार राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (SIR) कार्यक्रम सुरू झालेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक 30 जून 2026 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार आता घरोघरी जाऊन गणनाप्रपत्र भरून घेण्याचा कार्यक्रम दिनांक 8 ऑगस्ट 2026 पर्यंत चालू राहणार आहे. या अनुषंगाने काही प्रसिद्धी माध्यमांवर/सामाजिक माध्यमावर प्रसारित होत असलेले वृत्ते मजकूर तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला प्राप्त होऊन असणाऱ्या तक्रारी विचारात घेऊन खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत-

1) आयोगाचे निर्देश विचारात घेता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी किमान एक तरी वेळा भेट देणे आवश्यक आहे. जे घर बंद असेल, त्या घरी किमान तीन वेळा भेट देणे अनिवार्य आहे व त्याच्या नोंदी ठेवणे सुद्धा बंधनकारक आहे.

2) असे निदर्शनास येते की शहरी भागामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी एकाच ठिकाणी बसून गणना अर्ज भरून घेत आहेत. मतदार यादी मध्ये अचूक पत्ता नसल्यास घरोघरी जाण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी सर्वसाधारणतः संबंधित मतदान केंद्रामध्ये किंवा सोसायटी आवारात किंवा सार्वजनिक / शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी संबंधित बीएलओ यांनी बसून मतदारांकडून अचूक पत्ते घेणे अपेक्षित आहे व तदनंतर मतदाराच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घ्यावयाचे आहे. अन्यथा मतदार संबंधित ठिकाणी राहतात याची खात्री करता येणार नाही.

3) असे कॅम्प घेताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्पचे आयोजन करण्यात येऊ नये. निवडणूक आयोग निपक्षपातीपणे कार्यरत असल्याने अशाप्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्प आयोजित केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. मतदारांचा पत्ता शोधणे व इतर माहितीसाठी राजकीय पक्षांनी अधिकृतरित्या नेमलेल्या बीएलए ची मदत घेता येईल.

3) राजकीय पक्षांनी विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहे. मात्र आपल्या कार्यालयामध्ये अशाप्रकारे बीएलओ चा कॅम्प आयोजित केल्याचे होर्डिंग किंवा बॅनर लावणे चुकीचे आहे व तशी कल्पना त्यांना देऊन असे बॅनर किंवा होर्डिंग काढून टाकण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

4) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) अधिकारी यांच्यावर घरोघरी जाऊन गणनाप्रपत्र वाटप करणे व ते भरून घेणे तसेच त्यांचे डिजिटायझेशन करणे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. मर्यादित कालावधीत ही जबाबदारी पूर्ण करताना BLO यांच्यावर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांना पुरेशा सहाय्यकांची मदत उपलब्ध करून द्यावयाची आहे. BLO सुपरवायझर तसेच मदतीसाठी नेमलेले सहाय्यक यांच्यामध्ये कामाचे योग्य वाटप करून देण्याची जबाबदारी संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांची राहील.

5) महसूल विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील तसेच स्थानिक प्राधिकारी संस्थांचे अधिकारी / कर्मचारी यांनी आता या टप्प्यावर पूर्ण सहभाग देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांचे काम करण्यासाठी सहकार्य करावयाचे आहे. या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या तयारीतील स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी सुद्धा वापरण्यात येतात या गोष्टीची जाणीव सर्व स्थानिक प्राधिकारी संस्थांना करून देण्याची आवश्यकता आहे.

6) यापूर्वीच दिलेल्या निर्देशाप्रमाणे मतदार नोंदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीचे इंटरनेट कनेक्शन डिजिटायझेशन कामाकरता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. डिजिटायझेशन साठी अतिरिक्त मदतीसाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल. राजकीय पक्षाशी संबधित कोणत्याही व्यक्तीची मदत किंवा हस्तक्षेप या कामात होणार नाही याची दखल घेण्यात यावी.

7) प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा विभागाच्या शिक्षण संचालकांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकाकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. त्यानुसार BLO म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे शैक्षणिक तास कमी करण्यात यावे तसेच इतर शिक्षकांनी BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना मदत करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या क्षेत्रीय शिक्षण अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन वरील निर्देशाचे काटेकोरपणे अनुपालन होत आहे याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

8) BLO ना काम करण्यास अडथळा येऊ नये म्हणून काही क्षेत्रांमध्ये शाळांच्या वेळा सुधारित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे ही नियोजन करता येईल.

9) या कार्यालयाने एनआयसी महाराष्ट्र यांच्या मदतीने फोटो सिमिलर एन्ट्रीजच्या (PSE) आधारे दुबार नावांच्या याद्या तसेच मतदार यादीतील अस्पष्ट व अप्रमाणित (Blur & Non-standard) फोटो असलेल्या मतदारांच्या याद्या उपलब्ध करून दिले आहेत. विशेष सखोल पुनरिक्षण अंतर्गत तयार होणारी मतदार यादी दोष विरहित व अचूक असणे आवश्यक असल्याने या कार्यालयाने दिलेल्या सूचनानुसार या प्रकरणी गांभीर्यपूर्वक कार्यवाही करण्यात यावी. राजकीय पक्षांकडून वारंवार दुबार मतदारांबाबत आरोप करण्यात येतात. अशी कार्यवाही केल्याने दुबार मतदारांची नावे वगळण्यात येण्याबरोबर दुपार मतदारांचे गणना प्रपत्र भरण्याच्या अतिरिक्त कामाचा बोजा सुद्धा आपोआप कमी होईल. अशा मतदाराच्या दुबार असलेल्या गणनाप्रपत्रावर केवळ’ Already Enrolled at AC/Part/Sl No.’ असे नमूद करता येईल. मात्र

दुबार मतदारांबाबत अशी कार्यवाही करताना संबंधित मतदार दुबार आहे व त्याच्या मूळ ठिकाणचा गणना प्रपत्र भरण्यात आलेला आहे, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी जिल्हा मतदार संघ तसेच मतदार यादी भाग निहाय याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक बैठकीत यापुढे याबाबतही आढावा घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. संबंधित निवडणूक नायब तहसीलदार यांनी या कामकाजाचे योग्य रीतीने समन्वय करावे.

10) चालू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते या कामासाठी कार्यरत / अधिसूचित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची बैठक आयोजित करू शकत नाहीत तसेच BLO यांना निर्देश देऊ शकत नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

11) गृहभेटीच्या टप्प्याचे आता काहीच दिवस शिल्लक असल्याने मतदार नोंदणी अधिकारी यांनी कमी काम झालेल्या BLO व BLO सुपरवायझर यांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.

12) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना योग्य रीतीने प्रशिक्षण न दिल्यामुळे चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सबब सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, विशेषता मानधनावर नियुक्त (कंत्राटी) प्रवर्गातील असे अधिकारी यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ही जबाबदारी मतदार नोंदणी अधिकारी तसेच सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांची आहे.

13) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना सुद्धा योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे ज्यायोगे ते केवळ या कार्यक्रमाचे निरीक्षण न करता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मदत करू शकतील. जे मतदार सापडत नसतील ते अशा मतदारांची यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना देण्या अपेक्षित आहे, ज्यायोगे त्यांची या कामी मदत होऊ शकेल.

14) वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमां द्वारे तसेच सामाजिक माध्यमाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या वृत्त किंवा संदेशाची दखल घेऊन चुकीच्या बातम्यांचे किंवा संदेशांचे त्वरित खंडन करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित वृत्त/संदेशाच्या अनुषंगाने प्रसिद्ध पत्रक किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन योग्य माहिती देण्यात यावी तसेच अधिकृत समाज माध्यमाच्या द्वारे सुद्धा याबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment