प्रसिद्धीपत्रक मतदारांना आवाहन sir prashiddhipatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्धीपत्रक मतदारांना आवाहन sir prashiddhipatrak 

मतदारांना आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम चालू असून दि.31.08.2026 रोजी प्रसिध्द झालेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावे अंतर्भूत करणे, वगळणी करणे किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करणे या साठी अर्ज करण्यासाठीदि. 12.10.2026 ही अंतिम तारीख आहे. दि.31.08.2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दि. 08.10.2026 पर्यंत 7,19,382 मतदारांनी आपले नाव मतदार यादीत अंतर्भूत करण्यासाठी नमुना-6 मध्ये अर्ज दाखल केले आहेत. तसेच, 3,99,925 मतदारांनी यादीमधील नोंदींमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी नमुना-8 मध्ये अर्ज दाखल केले आहेत. त्या व्यतिरिक्त मतदार यादीतील नावे वगळण्यासाठी नमुना-7 मध्ये 18,748 अर्ज प्राप्त झालेले आहेत.

नवमतदार तसेच राज्यात अन्यत्र स्थलांतरित झाल्यामुळे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ होऊ न शकलेले मतदार यांच्याकरिता दि.10 व 11 ऑक्टोबर, 2026 या दिवशी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि.01.10.2026 या अर्हता दिनांकास किंवा त्या पूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्यथा पात्र असलेले तथापि प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ न झालेले मतदार आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करणसाठी नमुना-6 व त्या सोबतचे आवश्यक घोषणापत्र भरुन व आवश्यक कागदपत्रासह आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवू शकतात. हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित मतदार नांदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्र स्तीरीय अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील किंवा दि. 10 व 11 ऑक्टोबर, 2026 या दिवशी संबंधित मतदान केंद्रांवर दाखल करता येतील. या व्यतिरिक्त भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळा वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.

त्याच प्रमाणे प्रारुप मतदार यादीमधील ज्या मतदारांना मागील SIR मधील नोंदीशी जुळवणी न झाल्यामुळे (No Mapping) किंवा जुळवणी होऊनही तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळल्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना त्या अनुषंगाने कागदपत्रे संबंधित मतदान केंद्रांवर सादर करता येतील. भारत निवडणूक आयोगाने नोटीसमध्ये विहित केलेल्या कागदपत्रांपैकी कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य कोणतेही वैध कागदपत्र/दस्ताऐवेज संबंधित मतदार दाखल करु शकतील. या अनुषंगाने विहित केलेल्या 13 कागदपत्राव्यतिरिक्त “Any other Documents” अपलोड करण्याची सुविधा BLO App वर नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

नवमतदारांनी/प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या मात्र अन्यथा पात्र असलेल्या नागरिकांनी वरील सुविधेचा फायदा घ्यावा व अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव सुनिश्चित करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment