पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत pavitra portal shikshak bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत pavitra portal shikshak bharti

संदर्भ

: १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.आस्था/प्राथ-१०६/पवित्र-पोर्टल/बिंदुनामावली/२०२३/७२९६, दि.२९.११.२०२३

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था/प्राथ-१०६/टेट-२५/बिंदु-तपा/२०२५/१५०२४४८, दि.१७.१०.२०२५

३. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र क्रमांक शिसंमा / २०२५-२६/समायोजन/टी-८ब/१७०४०८८, दि.०४.०२.२०२६

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२५/प्र.क्र.९५३/टीएनटी-१, दि.०१.०१.२०२६

५. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.बीसीसी-२०२३/प्र.क्र.५४/आरक्षण-५. दि. ११.०२.२०२६

६. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०२६/प्र.क्र.७/आरक्षण-५, दि. ०६.०४.२०२६

७. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२६/प्रक्र १६५/टीएनटी-१ दिनांक ३०/०३/२०२६

८. या कार्यालयाचे पत्र क्रमांक मरापप/पवित्र पोर्टल/२०२६/२७१५९३५ दिनांक १७/०३/२०२६.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या / खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक, रात्र शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्यादृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ गध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी/विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.

शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२५” चे आयोजन दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये करण्यात आले होते, त्याचा निकाल दिनांक १८/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी चाचणीसाठी नोंदणी केली असून प्रत्यक्षात २,११,३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. दिनांक १५/१२/२०२५ ते १५/०१/२०२६ या कालावधीमध्ये उमेदवारांकडून पवित्र पोर्टल वर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यात आलेले आहेत. एकूण १,७०,१०८ उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२५ नुसार पदभरतीसाठी आवश्यक बिंदुनामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून यापूर्वी दिनांक १७/१०/२०२५ व दिनांक १७/०३/२०२६ अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती आवश्यक आहे.

संचमान्यता सन २०२५-२६ ची कार्यवाही पूर्ण झाली असून त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही दिनांक ३१/०३/२०२६ पूर्वी करण्याचेही शिक्षण संचालक कार्यालयाचे स्तरावरुन क्षेत्रिय कार्यालयांना कळविण्यात आले आहे.

संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ०१ जानेवारी, २०२६ नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संचमान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर म्हणजे मे २०२६ अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. सदर पदभरतीची कार्यवाही करताना शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या ८०% च्या मर्यादेत मागणी नोंद करावी.

पवित्र पोर्टलवर सदर नोंदणी करण्यासाठी दिनांक ०१/०५/२०२६ ते दिनांक ३१/०५/२०२६ असा कालावधी देण्यात येत आहे, नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कालावधीमध्ये जाहिराती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

शासन निर्णय pdf download

आपल्या अधिनस्त शाळांतील शिक्षक पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

Related posts:

Leave a Comment