केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, २०२५ जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबविणे kendrapramukha exam
संदर्भः १. विशेष अनुमती याचिका क्र. १४०१६-१४०१९/२०२६ या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेले दि. २६.०५.२०२६ रोजीचे आदेश.
२. रिट याचिका क्र. २९९३/२०२६ व अन्य समान प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने पारीत केलेला दि. १०.०४.२०२६ रोजीचा न्यायनिर्णय.
३. शासनपत्र क्र. संकीर्ण २०२६/प्र.क्र.४९/टीएनटी-१/दि.२०/२/२०२६
४. शासनपत्र क्र. संकीर्ण २०२६/प्र.क्र.४९/टीएनटी-१/दि.०४/०६/२०२६
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शासन निर्णय दिनांक २९-८-२०२५ अन्वये निर्देशित केलेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे नियुक्ती देण्यासाठी समुहसाधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ चे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.३/२/२०२६ व दि.४/२/२०२६ रोजी प्रत्येकी तीन सत्रात घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि.१३/३/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
त्यानुसार निवडसूची तयार करण्याच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक ०४/०६/२०२६ नुसार सविस्तर सूचना प्राप्त झालेल्या आहेत. (प्रत सलग्न) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समुहसाधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार आपल्या जिल्ह्याची उमेदवारांची यादी यासोबत जोडून आपणास उपलब्ध करुन
देण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भाधीन शासन पत्रातील सूचना, संदर्भ क्र.१ व २ येथील आदेशाचे/न्यायनिर्णयाचे कृपया अवलोकन करावे.
या अनुषंगाने विषयांकित निवड यादी तयार करताना शासन पत्रात नमूद केल्यानुसार पुढीलप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
१. प्राप्त झालेल्या यादीचे अवलोकन करुन सदर यादी उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार आहे किंवा कसे, याची खातरजमा करावी.
२. जिल्हा परिषदेने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ करीता जितक्या पदांची जाहिरात प्रसिध्द केली होती त्याच्या अडीच पट उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावेत. त्या उमेदवारांना यादी उपलब्ध झाल्यापासून ५ दिवसाच्या आत एका विशिष्ट दिनांकास कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. कागदपत्रांच्या पडताळणी आधारे या उमेदवारांची पात्रता या शासनपत्रासोबत जोडलेल्या तपासणीसूची व कागदपत्र पडताळणीच्या आधारे प्रमाणे तपासण्यात यावी.
३. शासन पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचीनूसार व कागदपत्र पडताळणीच्या आधारे, अशी पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून २ दिवसांत उमेदवारांची अंतिम निवडसूची तयार करण्यात यावी.
४. अंतिम निवडसूचीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना निवडसूची तयार केल्यानंतर गुणवत्ताक्रमानुसार नियुक्ती आदेश व समुपदेशनाने पदस्थापना देण्याबाबतचे आदेश पुढील २ दिवसांत निर्गमित करावे.
५. दिव्यांगासाठीचे आरक्षण हे दिव्यांगत्वाच्या वर्गवारीनुसार लागू आहे. जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग वर्गवारीचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद दिव्यांगाच्या अन्य वर्गवारीतून अथवा सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यात येऊ नये. सदर पद रिक्त ठेवण्यात यावे.
६. उपरोक्त प्रमाणे नमूद केलेली कार्यवाही मा. उच्च न्यायालयाच्या संदर्भ क्र. १ येथील न्यायनिर्णयान्वये दिलेल्या निर्देशांशी सुसंगत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. १४०१६-१४०१९/२०२६ या प्रकरणामधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधिन राहून उपरोक्तप्रमाणे नमूद केलेली कार्यवाही करावयाची आहे. सबब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना सदर नियुक्ती पुर्वोक्त विशेष अनुमती याचिकांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधिन आहे या बाबीचा स्पष्ट उल्लेख नियुक्ती आदेशात संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी स्पष्टपणे करणे आवश्यक राहील.
७. शासन पत्रासोबतची तपासणी सूची, शासनपत्रातील उदाहरण व शासन पत्रातील सर्व सूचनांचे पालन करून योग्य ती कार्यवाही करावी.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ च्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया चालू झाली आहे. प्रस्तावांतर्गत निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सुमारे २४०० पदे या शिक्षक पदभरतीसाठी उपलब्ध होऊ
1/1941378/2026
शकतात. शिवाय आगामी शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु होत असल्याची पार्श्वभूमी व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आलेल्या वाढीव जबाबदाऱ्या विचारात घेता देखील उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विहित मुदतीत कार्यालयास पाठवण्यात यावा,
सोबत १. उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार जिल्हानिहाय उमेदवारांची यादी
२. शासनपत्र क्रमांक संकीर्ण २०२६/प्र.क्र. ४९/टीएनटी-१, दि.०४.०६.२०२६ व तपासणीसूची








