विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत padonnati paripatrak
संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६ दि १४/०५/२०२६
२. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र. ४५७४/२०२६ मधील निर्णय दि.१०/०७/२०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाचे पत्र दिनांक १४/०५/२०२६ नुसार विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे बाबत निर्देश या कार्यालयामार्फत देण्यात आले होते.
तथापि मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक ४५७४/२०२६ मधील निर्णय दि.१०/०७/२०२६ नुसार मा. न्यायालयाने संचालनालयाचे पत्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६ दि.१४/०५/२०२६ रद्द केले आहे. तरी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत पुढील शासन निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये,


![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)








