सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या एकरकमी लाभाकरिता निधी वितरण anganvadi paripatrak
संदर्भ:
२) म. व बा.वि. वि., शा. नि. क्र. एबावि-२०२१/प्र.क्र.१०२/का.०६, दि. २६.०२.२०२४
शासन निर्णयः-
संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या दिनांक ०१.०४.२०२२ पासूनच्या सेवानिवृत्ती / मृत्यू / राजीनामा/सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणांना एकरकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक ३०.०४.२०१४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सुत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुषंगाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक-१ मधील प्रधान लेखाशीर्ष/उपशीर्ष/उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक-२ मध्ये नमूद अर्थसंकल्पिय तरतुदीमधून रकाना क्रमांक-३ मध्ये दर्शविल्यानुसार एकुण रुपये ३०.३४७५ कोटी (अक्षरी रुपये तीस कोटी चौतीस लक्ष पंच्याहत्तर हजार फ़क्त) एवढा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.










