शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयातील “राज्य प्रकल्प समन्वयक” हे पद मंत्रालयीन उपसचिव संवर्गातून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत rajya prkalp samanvayak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयातील “राज्य प्रकल्प समन्वयक” हे पद मंत्रालयीन उपसचिव संवर्गातून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत rajya prkalp samanvayak

संदर्भ : १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७/का.१२. दिनांक १७.१२.२०१६

२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.५१०/का.१२. दिनांक १६.०२.२०१८

३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र संकीर्ण-२०१७/प्र.क्र.१२०/कार्या-१४,

दिनांक ३१.०८.२०१७

महोदय/महोदया,

संदर्भाधिन क्र.१ येथील दिनांक १७.१२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रतिनियुक्तीचे धोरण निश्चित करण्यात आले असून संदर्भाधिन क्र.२ येथील दिनांक १६.०२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये सदर धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, संदर्भाधिन क्र.३ दिनांक ३१.८.२०१७ च्या शासन निर्णयान्वये मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीबाबत कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.

२. उक्त शासन निर्णयास अनुसरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयातील “राज्य प्रकल्प समन्वयक” हे पद मंत्रालयीन उप सचिव संवर्गातून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत मंत्रालयीन विभागातील उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात येत आहे.

३. उपरोक्त नमूद केलेले पद मंत्रालयीन उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्याकरिता सदर जाहिरात प्रसिध्द करण्यात येत असल्याने या जाहिरातीस अनुसरुन क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर पदाकरिता या विभागाकडे अर्ज सादर करु नयेत. असे अर्ज सादर

करण्यात आल्यास ते विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच, त्याबाबत संबंधितांस काहीही उत्तर कळविण्यात येणार नाही.

४. उपरोक्त पदासाठी प्रतिनियुक्तीवर जाण्यास इच्छुक असलेल्या मंत्रालयीन विभागातील उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांनी परस्पर या विभागाकडे अर्ज सादर करु नयेत. त्यांनी आपापल्या विभागांमार्फत अर्ज सादर करावेत. परस्पर अर्ज सादर केल्यास त्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व त्याबाबत संबंधितांस काहीही उत्तर कळविण्यात येणार नाही.

५. सर्व संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी इच्छुक उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतूदीनुसार अर्जाची छाननी करुन आपल्या विभागाच्या सचिवांच्या मान्यतेने इच्छुक संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव सोबत जोडलेल्या प्रपत्रातील माहिती व मागील पाच वर्षांच्या परिपूर्ण गोपनीय अहवालांच्या छायांकित प्रतींसह या कार्यासनाकडे दिनांक ०७.०८.२०२६ पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठवावा. (नोंदणी शाखेत पाठवू नये)

६. एकदा निवड झालेल्या उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांचे नांव मागे घेता येणार नाही. तसेच, आपल्या विभागातून सदर पदावर प्रतिनियुक्तीसाठी जाण्यास कोणीही अधिकारी इच्छुक नसल्यास तसेही कृपया दिनांक ०७.०८.२०२६ पर्यंत या विभागास कळविण्यात यावे.

७. सर्व संबंधित मंत्रालयीन विभागाना सूचित करण्यात येते की, ज्या विभागातील उपसचिवांचे पद प्रतिनियुक्तीमुळे रिक्त होईल, त्या पदावर प्राधान्याने अधिकारी उपलब्ध करुन देण्यात येईल.

८. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सदरचे पत्र त्यांच्या विभागातील सर्व उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावे.

सदर पत्राची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संगणक सांकेतांक २०२६०७१७१२२२०४३२०७ असा आहे. सदर पत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment