राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेतंर्गतचा निधी पुनर्विनियोजनाव्दारे लेखाशिर्ष २२०२ आय ६१२ मधून वितरीत करण्याबाबत (सन २०२६-२७) mofat ganvesh shoe and socks paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेतंर्गतचा निधी पुनर्विनियोजनाव्दारे लेखाशिर्ष २२०२ आय ६१२ मधून वितरीत करण्याबाबत (सन २०२६-२७) mofat ganvesh shoe and socks paripatrak 

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांकः एसएसए-२०२६/प्र.क्र.६०/एस.डी.३/१६२६८८१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक: २४ सप्टेंबर, २०२६

वाचा:-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसए १२१४/प्र.क्र.५०/एसडी-३, दि.०६.०७.२०२३

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसए १२२०/प्र.क्र.१५४/एसडी-३, दि.०२.०४.२०२५

३) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.०९.०४.२०२६ व दि.०७.०५.२०२६

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसए २०२६/प्र.क्र.६०/एसडी-३, दि.०४.०५.२०२६

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसए १२२०/प्र.क्र.१५४/एसडी-३, दि.२९.०५.२०२६

६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. पुनर्वि-२८२६/प्र.क्र.७२/अर्थसंकल्प, दि.२४.०९.२०२६

प्रस्तावना :-

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्याबाबतचा निर्णय दि.०६ जुलै, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरीता निर्धारित केलेल्या प्रति गणवेश रु.३००/- याप्रमाणे राज्य शासनाने सुध्दा दोन गणवेशाकरीता रु.६००/- प्रति विद्यार्थी रक्कम निश्चत केली आहे.

सदर योजनेचा निधी सन २०२६-२७ करीता लेखाशिर्ष २२०२के८३८ मध्ये अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. सदर लेखाशिर्षामधून संदर्भाधिन क्र.४ येथील दि.०४.०५.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु. ८४,००,००,०००/- इतका निधी वितरीत करण्यात आला होता. त्यातून रु.३४,१३,१३,७६१/- इतका निधी खर्च करण्यात येऊन रु.४९,८६,८६,२३९/- इतका निधी शिल्लक राहिला आहे.

समग्र शिक्षा अभियान ही योजना दि.०१.०७.२०२६ पासून SNA SPARSH कार्यप्रणालीवर ऑनबोर्ड झाली असल्यामुळे सदर योजनेशी सलग्न असलेली मोफत राज्य गणवेश योजना या उपक्रमासाठी लेखाशिर्ष २२०२ के ८३८ मध्ये अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीपैकी वित्त विभागाने या विभागास उपलब्ध करुन दिलेल्या रु.८४,००,००,०००/- इतक्या निधी मधून रु.३४,१३,१३,७६१/-इतका निधी वितरीत करुन शिल्लक राहिलेला रु.४९,८६,८६,२३९/- व उर्वरीत ४०टक्के प्रमाणात रु.५६,००,००,०००/- असा एकूण रु.१०५,८६,८६,२३९/- इतका निधी SNA SPARSH कार्यप्रणाली अंतर्गत केंद्र हिस्सा लेखाशिर्ष २२०२ आय ६२१ च्या अनुरुप असणारा राज्य हिश्याच्या लेखाशिर्ष २२०२ आय ६१२ या लेखाशिर्षामध्ये पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली होती. वित्त विभागाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे. संदर्भाधिन क्र.६ येथील दि.२४.०९.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये लेखाशिर्ष २२०२ आय ६१२ मध्ये पुनर्विनियोजनाने वितरणासाठी उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर योजनेकरीता आवश्यक निधी SNA SPARSH प्रणाली अंतर्गत समग्र शिक्षा अभियान या योजनेच्या राज्य हिश्याच्या लेखाशिर्षाचे Top-up म्हणून मॅपिंग असल्याने समग्र शिक्षा अभियान या योजनेच्या राज्य हिश्याच्या लेखाशिर्षात पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन दिलेला निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत पुनर्विनियोजनाव्दारे उपलब्ध झालेला रु.१०५,८६,८६,२३९/- (रुपये एकशे पाच कोटी सहाऐंशी लक्ष सहाऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस फक्त) इतका निधी खालील लेखाशिर्षामधून वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. प्रस्तुत शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.५८१/२०२६/व्यय-५, दि.१७.०९.२०२६ व अनौपचारिक संदर्भ क्र.७६/२०२६ कोषा प्रशा-४, दि.२१.०९,२०२६ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर निधी सशर्त अनुदान असुन यापूर्वी तसेच या आदेशाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विहीत कालावधीत सादर करण्यात यावे.

४. सदर निधी सायबर कोषागार कार्यालयामार्फत (कोषागार संकेतांक-८१०१) आहरित करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. समग्र २०२५/प्र.क्र.१४५/एसडी-१, दि.०९.०९.२०२५ व शासन निर्णय क्र.संकीर्ण २४२५/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प, (ई-१३४७२००) दि.१९.०९.२०२५ अन्वये राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच देयके आहरण व संवितरण करण्याकरिता उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना “आहरण व संवितरण अधिकारी” घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तावित निधी आहरित व वितरित करताना विहित कार्यपध्दतीचे अनुपालन करावे.

५. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०९२४१८०००६९९४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन निर्णय pdf download 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment