प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026-27 च्या पूर्व तयारीबाबत primary scholarship exam paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026-27 च्या पूर्व तयारीबाबत primary scholarship exam paripatrak 

संदर्भ

:- 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. प्राडशि/प्र.क्र.23/2025 (ई-1142170)/एसडी-5,

दि. 17/10/2025.

2. ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिसेफ-2026/प्र.क्र.39/वित्त-3, दि. 26/06/2026.

उपरोक्त विषय व संदर्भ क्र. 1 नुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2027 च्या परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी 2027 मध्ये करण्यात येणार आहे. सदर शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. 4 थी व इ. 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे.

संदर्भ क्र. 2 च्या शासन निर्णयानुसार राज्यतील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरूस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सदर राखीव ठेवलेल्या 5% निधीमधूनच जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शाळांतील इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2027 ची अधिसूचना माहे ऑक्टोबर 2026 मध्ये प्रसिध्द करण्यात येणार असून संदर्भ क्र. 2 नुसार सदर परीक्षेसाठी आपल्या अधिनस्त जिल्हा परिषद / मनपा शाळांचे शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी आवेदनपत्र शुल्क जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून भरणा करण्याची तरतूद करावी.

तसेच इ. 4 थी व इ. 7 वी 2027 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळांना पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची व विद्यार्थी आवेदनपत्रामध्ये (इ.4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 नुसार) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून संकलित करण्यास आपल्या स्तरावरून कळवावे. सदर माहिती भरलेली प्रपत्र शाळेतच ठेवावी, जेणेकरून सदर परीक्षेची अधिसूचना प्रसिध्द होऊन ऑनलाईन लिंक उपलब्ध होताच आवेदनपत्रे ऑनलाईन भरणे सुलभ, जलद व बिनचुक होईल. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना उपरोक्तनुसार कार्यवाही करण्यास सूचित करावे. सोबत : संदर्भीय शासन निर्णय

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment