राज्य शासकीय कार्यालयातील गट-क संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत mpsc saralseva paripatrak
संदर्भ :-
१. सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र. मलोआ-११२६/प्र.क्र.८९/मलोआ, दिनांक ४/०५/२०२६
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.१२२४/प्र.क्र.७०/सेवा-४ (का.१३-अ), दिनांक ५/५/२०२६.
विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना दिनांक ४ मे, २०२६ (संदर्भ-१) अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) (दुसरी सुधारणा) विनियम, २०२६ खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात आली आहे.
“२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ सोबत जोडलेल्या अनुसूचीमधील अनुक्रमांक ३३ (टी) नंतर खालील प्रमाणे नोंद वाढविण्यात यावीः-
(यू) राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रीत) आणि गट-क (पोलीस, शिक्षक, वाहनचालक आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून) ची सर्व पदे”
२.० सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.०५/०५/२०२६ (संदर्भ-२) अन्वये गट-क संवर्गाची (लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, ग्रंथपाल परिचर, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ) ही पदे नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यकक्षेत गेली आहे.
३.० सन २०२६ करीता लेखापाल, लिपीक या संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावयाची असल्याने मागणीपत्र मागविण्यात आले होते. ब-याच वनवृत्तांकडून मागणीपत्र या कार्यालयास प्राप्त झाले. परंतु, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दि.४/०५/२०२६ अन्वये गट-क संवर्गातील सरळसेवा कोटयातील सर्वच पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेलेली आहेत.
४.० त्या अनुषंगाने कळविण्यात येते की, तरी, सन २०२७ करीता गट-क संवर्गाची सरळसेवेने भरावयाची पदांची (उदा. वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपीक, शारीरिक प्रशिक्षक ड्रील शिक्षक,
बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृह प्रमुख, माहूत, लॉच चालक, कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर व पशु परिचर) मागणीपत्र सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०२/१२/२०२१ व शासन निर्णय दि.०२/११/२०२२ मधील विहीत प्रपत्रात आवश्यक कागदपत्रासह सादर करावयाची आहेत. त्यानुसार मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
सहपत्रः- अधिसूचना दि.४/०५/२०२६











