राज्यभरात राष्ट्रीय स्वतंत्रता दिना निमित्त “तंबाखू मुक्त शपथ” घेणेबाबत tobacco free school paripatrak
संदर्भ:- आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे पत्र जा.क्र. NQAS/आआसे/तंबाखू मुक्त शपथ घेणेबाबत /१५५-२३८/२६, दि. १३/०८/२०२६
उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये कळविलेनुसार, राज्यभरात स्वतंत्रता दिनानिमित्त सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींमध्ये “तंबाखू मुक्त शपथ” घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आपल्यास्तरावरुन खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :
१. सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये स्वतंत्रता दिन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत माहिती देऊन “तंबाखू मुक्त शपथ” घ्यावी. (प्रत संलग्न)
२. ग्रामपंचायत व ग्रामसभांमध्ये ASHA/ANM/MO यांच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीबाबत व्याख्याने आयोजित करून ग्रामस्थांना शपथ घ्यायला प्रवृत्त करावे.
३. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने आपला परिसर धूम्रपान मुक्त (तंबाखू मुक्त) घोषित करून त्याबाबतचे घोषणापत्र जाहीर करावे.
४. “धूरमुक्त किंवा तंबाखूमुक्त गाव” ही मोहीम राबविण्यासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय साधावा.
५. नियमित शाळा भेटीमध्ये याचा आढावा घेण्यात यावा.
आपल्या अधिनस्त सर्व शाळांना याबाबत आपल्या स्तरावरुन आवश्यक अतिरिक्त सूचना देऊन शाळांना देऊन सदर उपक्रममाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
“तंबाखू मुक्तीची शपथ “
“शपथ”
तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परीणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर, या व्यसनांपासून. दूर राहण्याचा संकल्प करीत आहे.
माझे कार्यालय, माझे घर, आणि माझा परिसर तंबाखूमुक्त रहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी मी प्रयत्न करेन.
भारत सरकारच्या, २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेटमुक्त करेन.
मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि, माझा महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याचा प्रयत्न करेन
द्या तंबाखू व ई-सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्विकार










