स्थायी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या सुट्टयांबाबत big holiday paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्थायी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या सुट्टयांबाबत big holiday paripatrak 

संदर्भ:- म.खा.शा.क (सेवेच्या शर्ती) नियमावली मधील नियम १६ (१८) अ

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम १६ (१८) (अ) “जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाव्यतिरिक्त (परंतु उप-मुख्याध्यापकासहित) एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्टयांना हक्कदार असुनही एखाद्या वर्षात पूर्ण सुट्यांच्या किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्याऐवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल” अशी तरतूद आहे.

उदाहरणार्थ – एक वर्षात, एखाद्या कर्मचाऱ्याला ६३ दिवसाची पूर्ण सुटी उपभोगण्यास प्रतिबंध झाला तर त्याबदल त्यांस ३० दिवसांची अर्जित रजा मिळण्याचा हक्क असेल. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्याला एकूण सुटीपैकी २१ दिवसांची सुटी उपभोगण्यास प्रतिबंध झाला असेल त्या कर्मचाऱ्याला त्याबद्दल १० दिवसांची अर्जित रजा मिळण्याचा हक्क असेल त्या धर्तीवर अशी अर्जित रजा अनुज्ञेय होईल.

वरील तरतूदी प्रमाणे उचित कार्यवाही करावी. याबाबत या कार्यालयाकडे तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment