प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड घटकासाठी महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, १९६९ अन्वये मान्यता प्राप्त परवानाधारक रोपवाटिकांकडून रोपे/कलमे खरेदीस मान्यता देण्याबाबत ropvatika paripatrak
संदर्भ :- १. फळबाग लागवड मार्गदर्शक सूचना, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५
२. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ मार्गदर्शक सूचना
प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड घटकासाठी संदर्भ क्रमांक १ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र. ४.१० नुसार “फळबाग लागवडीसाठी खरेदी करावयाची कलमे शासन मान्यता प्राप्त (नोंदणीकृत) रोपवाटिकांमधून खरेदी केल्यास संबंधित रोपवाटिकेस राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) मानांकन प्राप्त असणे बंधनकारक राहील” असे नमूद आहे.
सदर अट शिथिल करण्यात येत असून फळबाग लागवडीसाठी खरेदी करावयाची कलमे रोपे महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, १९६९ अन्वये मान्यता प्राप्त परवानाधारक रोपवाटिकांमधून खरेदी करण्याची लाभार्थी शेतकऱ्यास मुभा राहील.











