पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येण्याऱ्या राज्यातील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्याबाबत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येण्याऱ्या राज्यातील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्याबाबत

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. अआशा-२०२६/प्र. क्र.१३३/का-११ (ई नस्ती क्र. १६६३९०५)

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२. दिनांक : १२ जून, २०२६

वाचा:

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक सीईटी-२०१५/प्र. क्र. १४९/टीएनटी-१ दिनांक २३/०६/२०१७

२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक सीईटी-२०१५/प्र. क्र. १४९/टीएनटी-१ दिनांक २०/०६/२०१८

३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक सीईटी-२०१५/प्र. क्र. १४९/टीएनटी-१ दिनांक ०७/०२/२०१९

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०१८/प्र. क्र. ३९७/टीएनटी-१ दिनांक २५/०२/२०१९

५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र. क्र. १०६/टीएनटी-१ दिनांक १०/११/२०२२

६. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र. क्र. ५०९/टीएनटी-१ दिनांक १३/१०/२०२३

७. शासन अधिसुचना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र. क्र. ३०२/ टीएनटी-१ दिनांक १२/०२/२०२५

८. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अआशा-२०२४/प्र.क्र. २१२/का. ११ दिनांक ९ एप्रिल, २०२५

९. शासन पत्र क्रमांक MTD-३६०२४/७९-२०२५-MTD (Desk-१५) दिनांक १२/१/२०२६

१०. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयबीसीसी-२०२३/प्र. क्र.५४/आरक्षण-५ दिनांक ११/०२/२०२६

११. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२६/प्र. क्र. १६६/टीएनटी-१ दिनांक ०२/०४/२०२६

प्रस्तावना :-

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक ०७/०२/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करतांना सर्व उमदेवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती “अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी” उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांमधुन “पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे निवड करण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यात आली असून सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे.

२. आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक /माध्यमिक / उच्च माध्यमिक आश्रमशाळामधील शिक्षक निवड करतांना सर्व पात्र उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होऊन त्यानुषंगाने आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यादृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय, दि. २३.०६.२०१७ आणि शासन निर्णय दि. ०७.०२.२०१९ अन्वये लागू करण्यात आलेली ‘पवित्र’ (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील अनुदानित आश्रमशाळेतील प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याची बाब या विभागाने दि. ०९.०४.२०२५ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी जी सुधारणा करण्यात येईल ती या विभागास योग्य फेरफारासह लागू राहील.

३. उपरोक्त शासन निर्णयांतील तरतूदी तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णयाच्या धर्तीवर प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळामधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे / सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णयांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या

संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे, तसेच सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-

२. शैक्षणिक अर्हताः-

शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक सीईटी-२०१५/प्र. क्र. १४९/टीएनटी-१, दिनांक ०७/०२/२०१९ व शासन शुध्दिपत्रक क्र. संकीर्ण-२०१८/प्र. क्र. ३९७/टीएनटी-१, दिनांक २५/०२/२०१९ तसेच शालेय शिक्षण विभागामार्फत वेळोवेळी विहीत करेल अशी शैक्षणिक अर्हता लागू राहील.

३. शिक्षण सेवक भरती कार्यपध्दतीः-

शिक्षण सेवक रिक्त पदावर भरती अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारावर करताना अनुसरावयाची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील :-

३.१ सरल” (Systematic Administrative Reforms for Achievement in Learning by Students) या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत सर्व अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/आश्रमशाळांची संचमान्यता करण्यात येईल. संचमान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर रिक्त पदांची माहिती प्रसिध्द करण्यात येईल.

३.२ सर्व व्यवस्थापनांच्या आश्रमशाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरती करीता, आश्रम शाळा संहिता- २०१९ अंतर्गत प्रकरण क्र. ४.३ मधील नियम क्र. ४.३.२. नुसार तसेच व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संबंधित शैक्षणिक संस्था “पवित्र” या संगणकीय प्रणालीमध्ये भरेल. त्यानुसार संबंधित शैक्षणिक संस्था ही संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास यांचेकडे पद मंजुरीचा व जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी सादर करेल. संबधित शैक्षणिक संस्था तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही याबाबतचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. बिंदूनामावली प्रचलीत कार्यपध्दतीनुसार तपासणे आवश्यक राहील.

३.३ प्रत्येक शैक्षणिक संस्थेस, संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अपर आयुक्त आदिवासी विकास तसेच आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना स्वतंत्र Login (User name, Password) उपलब्ध करुन दिला जाईल. अपर आयुक्त (सर्व), आदिवासी विकास विभाग यांच्या log in वर माहिती प्राप्त झाल्यानंतर सात कार्यालयीन दिवसांत माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणासह अमान्य करतील. अपर आयुक्त यांचेकडे जाहिरात प्रस्ताव सादर करताना संबंधित संस्थेने त्यात उमेदवाराची निवड मुलाखतीशिवाय अथवा मुलाखतीसह यापैकी कोणत्या मार्गाने केली जाणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.

३.४ अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी सात दिवसाच्या कार्यालयीन दिवसांच्या विहित कालमर्यादेत कार्यवाही न केल्यास त्याबाबतची सद्यःस्थिती आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या Login वर दर्शविली जाईल. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या Login वर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने तीन कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना कार्यवाही करण्याबाबत कळवतील.

संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी विहित मुदतीत जाहिरात परवानगी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास त्यांच्या गोपनीय अहवालात याबाबतची नोंद घेण्याबाबत आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक हे कार्यवाही करतील.

त्याबाबत ३.५. अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी मान्यता दिल्यानंतर संस्थेच्या मागणीनुसार ‘पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल व संस्थेच्या Login वर दिसेल. तसेच संस्थेच्या प्रतिनिधीस SMS (संदेश) प्राप्त होईल. सदर जाहिरात https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर प्रदर्शित होईल. तसेच संस्थेने त्यांच्या संकेत स्थळावर व राज्यस्तरीय आणि स्थानिक वृत्तपत्रात पद भरतीच्या अनुषंगाने जाहीर प्रसिद्धी द्यावी.

३.६ इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार, जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर निश्चित केलेल्या कालावधीच्या आत अर्ज करतील. उमेदवारांना अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील.

३.७ शासन अधिसूचना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दिनांक १२/०२/२०२५ नुसार खाजगी आदिवासी अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकाच्या प्रत्येक रिक्त जागेकरीता मुलाखतीसाठी १:३ या प्रमाणात उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलमार्फत व्यवस्थापकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. उपलब्ध करून दिलेल्या ३ उमेदवारांपैकी योग्य त्या उमेदवारांची निवड शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.०२.०४.२०२६ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार करण्यात यावी. मुलाखतीशिवाय पर्याय स्विकारणाऱ्या संस्थांना १:१ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतील.

संबंधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉगिनवर मुलाखतीसाठी पवित्र पोर्टल द्वारे उपलब्ध झालेली उपरोक्त यादीतील उमेदवारांची आश्रमशाळा संहिता २०१९ मधील प्रकरण क्र. ४.३ मधील अनु. क्र. ४.३.२.३. ई. शासनाने विहित केलेल्या पद्धतीने निवड समितीद्वारे मुलाखत घेऊन व त्यांची अध्यापन कौशल्ये तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करेल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील. मुलाखत व

अध्यापन कौशल्याव्दारे संबंधित शैक्षणिक संस्था उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहिर करतील. त्याचबरोबर मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या उमेदवाराला देखील त्यांचा निकाल व्यक्तिशः कळवतील. गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची नियुक्ती ७ कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल. निवड झालेला उमेदवार ७कार्यालयीन दिवसात हजर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्था करेल.

३.८ मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात उमेदवारांना जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. यात शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागांच्या पदांचा देखील समावेश असेल. उमेदवारास यापैकी त्याच्या सोईनुसार जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडणाऱ्या संस्थांच्या बाबतीत उमेदवारांना जास्तीत जास्त १०० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे लागू असेल.

i. मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना १:३ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, त्यानुसार उमेदवारांची देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त ३ प्राधान्यक्रमावर शिफारस होईल.

ⅱ. एखादया संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करुन दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया सबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.

ii. उपरोक्त प्रमाणे निवड प्रक्रिया राबविल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे त्या पदांचा गट, विषय, आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदविणे आवश्यक राहील.

iv. अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल.

v. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदिर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर यथास्थिती संबंधित अपर आयुक्त अथवा आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदर पद दोन शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी.

३.९ संबधित शैक्षणिक संस्था यांनी निवडसूचीतील उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान संबंधित उमेदवारांचे सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी. (शालान्त/उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी / पदविका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता) creamy layer प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता परीक्षा (इ.१ ली ते ८ वी करीता / अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण (महिला/दिव्यांग खेळाडू इत्यादी), त्या-त्या प्रवर्गात आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रांची तपासणी करतील.

३.१० नियुक्ती करीता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्यांच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील.

३.११ नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे छाननी अंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन अशी नोंद ऑनलाईन पध्दतीने करेल. त्यानुसार उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल. या संदर्भात उमेदवारास आक्षेप असल्यास सात दिवसांच्या आत पवित्र प्रणालीवर तो असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप शैक्षणिक संस्था/संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना प्रणालीवर दिसेल. त्यावर संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास सात दिवसांच्या आत निर्णय घेतील.

३.१२. छाननी अंती मुळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना खाजगी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन सात दिवसांच्या कालावधीत ई-मेल व्दारे तसेच नोंदणीकृत डाकेने नियुक्ती पत्र पाठवेल.

३.१३ उमेदवाराने नियुक्ती पत्रास सात दिवसांच्या आत स्विकृती कळविणे बंधनकारक राहिल. अशी स्विकृती दिल्यानंतर संबंधित आश्रमशाळेचा मुख्याध्यापक त्या उमेदवारास शिक्षण सेवक म्हणून “पवित्र” संगणकीय प्रणाली व्दारे ऑनलाईन रुजू करुन घेतील. तसा रुजू अहवाल प्रणालीवर भरतील. त्यामुळे सदर शिक्षण सेवकाची माहिती “सरल” संगणक प्रणालीवर आपोआप अद्ययावत होईल व “आश्रम शालार्थ” प्रणालीसाठी उपलब्ध राहील. निवड झालेल्या उमेदवारास संस्थेने रुजू करुन न घेतल्यास अशा संस्थांच्या आश्रमशाळेतील संबंधित पद व्यपगत करण्यात येईल.

३.१४ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दि ०७.०२.२०१९ मधील मुद्दा क्र. ५.९ नुसार “मुलाखतीसह निवड प्रकारासाठी” या प्रयोजनार्थ उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यामुळे अथवा अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या शिक्षण सेवकांच्या पदावर प्रतिक्षा यादीवरील पुढील उमेदवाराची निवड करता येईल.

३.१५ उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र याबाबत अपात्र झाल्यास, संबंधित उमेदवाराची या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल. मात्र आवश्यक अर्हतेच्या पूर्ततेअंती याचं किंवा सुधारित गुणाच्या आधारावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र असतील.

३.१६ शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. एका चाचणीच्या आधारे एकापेक्षा अधिक टप्प्यात पदभरती केली जाते. आदिवासी विकास विभागाची पदभरती देखील एकापेक्षा अधिक टप्प्यात होऊ शकते. यासाठी उमेदवाराच्या वयाची परिगणना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास केली जाते. ही वयोमर्यादा संबंधित चाचणीच्या आधारे राबविल्या जाणाऱ्या पदभरतीच्या सर्व टप्प्यांसाठी वैध आहे.

३.१७. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मध्ये प्राप्त झालेले गुण त्या चाचणीच्या आधारे पदभरतीचे जितके टप्पे राबविण्यात येतील, त्या सर्व टप्प्यांसाठी वैध मानले जातील.

३.१८. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची एकदाच निवड होईल. या चाचणीच्या आधारे होणाऱ्या पदभरतीच्या पुढील टप्प्यात उमेदवाराचा विचार करता येणार नाही. उमेदवारास अन्य पदावर नियुक्ती पाहिजे असल्यास त्याला पुढील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमध्ये प्रविष्ट होऊन निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.

३.१९. या शासन निर्णयानंतर करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरिता वैयक्तिक मान्यता तसेच ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील. तसेच अल्पसंख्याक संस्था संचालित आदिवासी अनुदानित आश्रमशाळा आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेली शिक्षण सेवक नियुक्ती वगळून “पवित्र प्रणाली” मार्फत करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरिता यापूर्वी असलेल्या तरतुदी कमी-अधिक प्रमाणात लागू राहतील.

४. शिक्षण सेवकाच्या नियुक्तीचा कालावधी :- आदिवासी विकास अनुदानित

प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ आश्रमशाळा तसेच शिक्षण सेवकांचा परिविक्षाधी कालावधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधिन दिनांक २७.०२.२००३ तसेच दिनांक १३.१०.२००० च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्वसाधारणपणे तीन वर्ष राहील.

५. नियुक्तीचे माध्यम :- शिक्षण सेवक पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराने ज्या माध्यमासाठी अर्ज केला असेल, त्या माध्यमासाठीच्याच पदावर नियुक्ती देण्यात येईल.

६. शिक्षण सेवकाची वयोमर्यादा : शिक्षण सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल

वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता ३८ वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४३ वर्ष राहील. समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना लागू होईल.

७. शिक्षण सेवक भरती “पवित्र” प्रणालीव्दारे न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना/शाळांना संबंधित रिक्त पदांचे वेतन किंवा वेतनेतर अनुदान अनुज्ञेय होणार नाही.

८. अल्पसंख्याक संस्था संचलित आश्रमशाळांमधील शिक्षण सेवक भरती आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस “पवित्र” प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही.

९. आदिवासी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ तसेच आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली राबवविण्याच्या अनुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास, म.रा. नाशिक हे “नोडल अधिकारी” म्हणून काम पहातील व त्यानुषंगाने शिक्षण आयुक्त/शिक्षण संचालक पुणे यांच्याशी समन्वय साधून यासंदर्भातील सर्व कामकाज पाहतील, त्यानुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी राज्यातील सर्व आदिवासी अनुदानित आश्रमशाळा मुख्याध्यापक/व्यवस्थापन/कार्यकारी संस्था, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व अपर आयुक्त, आदिवासी विकास (सर्व) यांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र Login (User name, Password) देणेबाबत कार्यवाही करतील.

१०. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरीता (इ. १ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक आरटीई-२०१०/प्र.क्र. ५७२/प्राशि-१, दि. १३ फेब्रुवारी, २०१३ मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पध्दती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील.

११. इयत्ता १ ली ते ५ वी, इयत्ता ६ वी ८ वी व इयत्ता ९ वी १० वी या गटांसाठी त्या त्या माध्यमांच्या शाळांकरीता शिक्षक उपलब्ध करुन देतांना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या त्या शाळांचे माध्यम जसे की, मराठी, उर्द, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरीता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक

प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायीक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र १२ वी विज्ञान किंवा बी.ए./एम.ए. इंग्रजी किंवा बी. एस्सी/एम. एस्सी अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे.

१२. आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे. तसेच, सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने वरील मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपध्दतीप्रमाणे संबंधित अनुदानित आश्रमशाळा मुख्याध्यापक/व्यवस्थापन/कार्यकारी संस्था, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व अपर आयुक्त, आदिवासी विकास (सर्व) यांनी यथोचित कार्यवाही करावी.

१३. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक निवडीसाठी पवित्र’ (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीसंदर्भात, भविष्यात वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय/तरतुदी/सुधारणा या आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी लागू राहतील.

१४. सदरहू शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेताक २०२६०६१२१४३०१७१२२४ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

प्रत,

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment