“भारताचे ‘मिसाईल मॅन” माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण marathi speech on maji rashtrapati do apj abdul kalam

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“भारताचे ‘मिसाईल मॅन” माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण marathi speech on maji rashtrapati do apj abdul kalam

भारताचे ‘मिसाईल मॅन’ तसेच भारतीय जनतेचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकिर जेनुलब्दिन कलाम आहे. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलब्दिन हे होते. त्यांचा नाव चालवण्याचा व्यवसाय होता तर त्यांच्या आईचे नाव अशिअम्मा हे होते. त्या कलाम. यांच्या आदर्श होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होती.डॉ. कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरम येथे पूर्ण झाले. तर पुढील शिक्षण रामनाथपुरम येथे पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण त्रिची येथे सेंट जोग्रेफ कॉलेजत पूर्ण केले.

याच काळात इंग्रजी साहित्य तत्वज्ञान आणि पदार्थ विज्ञानशास्त्र यांची त्यांना गोडी लागली. एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.एरोडायनामिक्स या शास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स मधून प्रशिक्षण संपवून ते एरोनॉटिक इंजिनियर म्हणून बाहेर पडले.1958 साली हवाई निर्देशालयात नागरी उड्डाण शाखेअंतर्गत त्यांची तंत्रज्ञ विभागात नेमणूक झाली. तेथे त्यांनी हॉवरक्राफ्ट मशीन बनवले.

1962 साली केरळमधील त्रिवेंद्रमजवळील भुंबा येथे अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली. तेथे अग्निबाण प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. यापूर्वी डॉ. कलाम हे अमेरिकेतील नासा संशोधन केंद्रात अवकाश तंत्रज्ञान संशोधनाचे प्रशिक्षण घेतले.तेथून परत आल्यावर 1963 साली ‘रोहिणी’ हा अग्निबाण विकसित झाला. तेथे डॉक्टर विक्रम साराभाई या श्रेष्ठ शास्त्रज्ञाचा फार मोठा प्रभाव डॉ. कलाम यांच्यावर पडला.

1962 व 1965 साली चीन व पाकिस्तान युद्धमध्ये भारताने शस्त्रास्त्र मध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी (सॅम) क्षेपणास्त्रे बनवण्याच्या कार्यात कलामांचा मोठा वाटा होता.1969 साली इस्रो (इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन) ची स्थापना झाली. एस.एल.व्ही.-3 या उपग्रहाची जबाबदारी डॉक्टर कलामांनी अतिशय कुशलतेने पार पाडली. ते एस.एल.व्ही.-3 प्रकल्पाचे प्रमुख बनले.

त्यांच्या अथक प्रयत्नांनी 1980 साली पहिल्या भारतीय उपग्रहाचे उड्डाण झाले. 1982 साली D.R.D.O. च्या प्रमुख संचालक पदी डॉ. कलाम यांची नेमणूक झाली.येथे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची आखणी केली. या अनुषंगाने पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, अग्नी ही आधुनिक क्षेपणास्त्रे निर्माण केली. यातच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारतात विकसित झाले.

एकात्मिक लक्षवेधी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या’ यशानंतर सुरक्षा खात्याचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख म्हणून डॉ. कलाम कार्यरत राहिले.मे 1988 मध्ये अणुउर्जा विभागाच्या सहाय्याने केलेल्या पोखरण अणुचाचणी या शक्ती कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा होता. अनुचाचणीच्या यशानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली.

1999 ते 2001 पर्यंत भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहिले. यानंतर 2020 पर्यंत भारत विज्ञान व तंत्रज्ञानात विकसित देश होईल याचा आराखडा तयार करण्यात आला.अशा महान कामगिरीबद्दल डॉ. कलाम यांना 1981 साली पद्मभूषण, 1990 साली पद्मविभूषण तर 1997 साली भारताचा सर्वोच्च सन्मान म्हणजे भारतरत्न हा किताब देण्यात आला. तर इसवी सन 1902 मध्ये भारतीयप्रजासत्ताकाचे ते 11 वे राष्ट्रपती बनले.

ए.पी.जे. अब्दुल कलाम हे शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये व्याख्यान देतानाच त्यांची प्रकृती बिघडली. यातच या महान व्यक्तींचे 27 जुलै 2015 रोजी ज्ञान देता देता निधन झाले.

Related posts:

Leave a Comment