शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत pavitra portal shikshak bharti
दिनांक १०/०८/२०२६
उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत
१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १७०१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.
A) दिनांक ०९/०८/२०२६ रोजी अखेर मुलाखतीशिवाय ८२६७१, मुलाखतीसह – ६३०५४
B) आज सकाळी ७:०० मुलाखतीशिवाय – ८७८२८, मुलाखतीसह-६८४२८
वरील प्रमाणे उमेदवारांना प्राधान्यक्रम पोर्टलवर जनरेट झालेले आहेत.
२. जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी कळविल्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षणात अंशतः बदल कळविले आहेत. या बदलामुळे जनरेट होणाऱ्या प्राधान्यक्रमामध्ये कोणताही बदल होत नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या आरक्षणात बदल होत आहे ते खालील प्रमाणे आहे.
३. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या Browser ची History / Cache clear करावी. त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास Incognito Window (Private Window) चा वापर करावा.









