कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण medical bill pratipurti
वाचा :
(१) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि.०९.०७.२०१४.
(२) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि.२५.०६.२०१५.
(३) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४, कोषा प्रशा-४, दि.२८.०६.२०१६.
(४) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/भाग-१/२०१४/कोषा प्रशा-४, दि.१७.०७.२०१७
(५) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/भाग-१/कोषा प्रशा-४, दि.१६.०७.२०१८
(६) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/भाग-१/कोषा प्रशा-४, दि.१९.०७.२०१९
(७) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/भाग-१/कोषा प्रशा-४, दि.१३.०७.२०२०
(८) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/भाग- १/कोषा प्रशा-४, दि.१६.०७.२०२१
प्रस्तावना-
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ ते ८ च्या शासन निर्णयांन्वये, कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच दि.३०.०६.२०११ नंतर सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी/कर्मचारी व कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांचेकरिता गटविमा तत्वावर आधारित वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना लागू करण्यात आली होती. आता योजनेच्या आढाव्याअंती कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता सुरु असलेल्या विमाछत्र योजनेची व्याप्ती वाढविण्याकरिता योजनेत बदल करण्याची व दि.०१.०७.२०२२ ते दि.३०.०६.२०२३ या कालावधीसाठी नुतनीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय-
प्रस्तुत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना दि.०१.०७.२०२२ ते दि.३०.०६.२०२३ या कालावधीत सेवानिवृत्त होणारे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी/कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील. चालू वर्षापासून या योजनेत केवळ सन २०२२-२३ या वर्षात सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी व शासकीय सेवेतील कार्यरत अधिकारी/कर्मचारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील.
२. सन २०२१-२२ मध्ये सदर योजनेंतर्गत विमा कंपनीकडे एकूण प्रिमियम रक्कम रूपये २६.४७कोटी जमा झाला आहे. तसेच दिनांक ३०.०६.२०२२ पर्यंत incurred claim ratio १०६% इतका झाला आहे. अद्याप पॉलिसीची मुदत दिनांक २४.०७.२०२२ पर्यंत शिल्लक असल्याने सदर कालावधीत उद्भवणाऱ्या दाव्यांची संख्या विचारात घेता एकंदरीत incurred claim ratio १२०% इतका होण्याची शक्यता विमा कंपनीने वर्तवली आहे.
३. वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याची प्रमाण कमी होत असल्याने वर्ष २०२२-२३ मध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा याकरिता कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या करिता वयोगट १८-३५ वर्षे, ३६-४५ वर्षे व ४६-५८ या वयोगटानुसार विमा हप्त्यांच्या दरामध्ये बदल करण्यात येत आहेत.
१. जे कर्मचारी विमाछत्र योजना कालावधीमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत परंतु सदर योजनेमध्ये समाविष्ठ होऊ इच्छित नाहीत, अशा कर्मचाऱ्यांकडून सदर योजनेमध्ये भविष्यातही समाविष्ठ न होण्याबाबतचे घोषणापत्र (Opting Out Declaration) घेण्यात यावे.
२. विमाछत्र योजनेमध्ये भविष्यात समाविष्ठ न होण्याबाबतचे घोषणापत्र (Opting Out Declaration) सन २०२१-२२ या पॉलिसी वर्षात समाविष्ठ करण्यात आले आहे. या वर्षात सेवानिवृत्त होऊन योजनेचे सदस्यत्व स्वीकारलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच सन २०२२-२३ या वर्षात विमाछत्र योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल. म्हणजेच तत्पूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व गतवर्षी योजनेचे सदस्य नसलेले सेवानिवृत्त कर्मचारी आता सदर योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाहीत.
३. सदर योजनेमध्ये नव्याने समाविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना ९० दिवसांचा प्रतिक्षा कालावधी असेल. तसेच, सोबत जोडलेल्या Annexure ॥ मधील आजाराकरिता योजनेमध्ये नव्याने समाविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना योजनेत प्रवेश केल्यापासून १८ महिन्यांचा प्रतिक्षा कालावधी असेल.
४. योजनेमध्ये गतवर्षी समाविष्ट सदस्यांनी चालू वर्षी ६० दिवसांपेक्षा अधिक कालावधीनंतर योजनेचे नूतनीकरण केल्यास ते योजनेमध्ये नव्याने समाविष्ठ झाल्याचे समजले जाईल.
५. सोबत जोडलेल्या Annexure || मधील आजाराकरिता २०% Co pay लागू राहिल.
६. ज्या हॉस्पिटल्समध्ये दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. यांचे PPN Network आहे, तेथेच फक्त PPN दर लागू राहतील.
७. तसेच सदर आदेशाशी विसंगत नसतील अशा मागील वर्षांच्या योजनेतील सर्व अटी व शर्ती सन २०२२-२३ साठीच्या योजनेकरिताही लागू राहतील.
४. सन २०२२-२३ करीताचे सुधारित विमा हप्त्याचे GST सह दर पुढीलप्रमाणे दिले आहेत.









