शासकीय रेखाकला परीक्षा २०२६ चे आयोजन व प्रश्नपत्रिकेबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना shaskiya rekhakala pariksha aayojan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय रेखाकला परीक्षा २०२६ चे आयोजन व प्रश्नपत्रिकेबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना shaskiya rekhakala pariksha aayojan paripatrak 

महोदय / महोदया,

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षा दिनांक २८, २९, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. सदर परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि वेळेत पार पाडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांनी खालील नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे:

साहित्य यादी: स्टिल लाईफ व वस्तुचित्र यांची साहित्य यादी परीक्षेच्या दोन दिवस अगोदर केंद्रप्रमुखांच्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात येईल.

प्रश्नपत्रिकेचे स्वरूपः परीक्षेची प्रश्नपत्रिका कोणत्याही भौतिक (Physical) स्वरूपात आगाऊ पाठवली जाणार नाही. प्रत्येक परीक्षा केंद्राच्या अधिकृत लॉगिन आयडीवर (Center Login) प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.

प्रश्नपत्रिका उपलब्ध होण्याची वेळ: सदर प्रश्नपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्राच्या लॉगिनवर सकाळच्या सत्रासाठी परीक्षेच्या दिवशी सकाळी ६.०० वाजता व दुपारच्या सत्रासाठी परीक्षेच्या दिवशी सकाळी १०.०० वाजता उपलब्ध होईल.

डाऊनलोड करणेः केंद्रप्रमुखांनी वेळेत लॉगिन करून प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकनिहाय एक प्रत डाऊनलोड करून घ्यावी.

प्रश्नपत्रिका वाटप नियमः विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची प्रत (Hard Copy) वाटप करावयाची नाही. लॉगिनमधून मिळालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न (फक्त विषय) केंद्र संचालकांनी/पर्यवेक्षकांनी वर्गातील फळ्यावर (Blackboard) स्पष्ट अक्षरात लिहून द्यायचे आहेत, विद्यार्थ्यांनी ते प्रश्न पाहून उत्तरपत्रिकेवर आपले काम करावयाचे आहे.

उत्तरपत्रिकेवरील सूचनाः परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य सूचना विषयनिहाय उत्तरपत्रिकेवर (Answer Sheet) आधीच मुद्रित (Print) केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ फळ्यावर लिहिलेला प्रश्न समजावून सांगणे व त्यानुसार कृती करण्यास सांगणे आवश्यक आहे.

गोपनीयताः प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी चार तास आधी मिळणार असल्याने, त्याची गोपनीयता राखण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित केंद्रप्रमुखांची राहील. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.

सर्व केंद्रप्रमुखांनी या सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार योग्य ती तयारी करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment