CTET परीक्षा ७ फेब्रुवारी, २०२६ विषय – मराठी पेपर क्रमांक – १ प्रश्नपत्रिका उत्तरासाहित ctet exam questions paper available
१. अंकिता सहा वेगवेगळ्या भाषा बोलते आणि समजते.
तिची भाषिक क्षमता म्हणजे-
(१) भाषाशास्त्रज्ञ
(२) बहुभाषिक वक्ता
(३) द्विभाषिक वक्ता
(४) एकभाषक वक्ता
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – २
२. तुम्हाला कूट-मिश्रण, कूट-परिवर्तन, मुलांची भाषा आणि कूट भाषा अशा विषयांचा अभ्यास करण्याची आवड आहे, यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे ?
(१) मानववंशशास्त्र
(२) समाजशास्त्र
(३) समाजभाषाविज्ञान
(४) सांस्कृतिक मानसशास्त्र
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – ३
३. पुढीलपैकी कोणती बाब ही विसंगत विश्लेषणाचा (Co-ntrastive analysis) घटक नाही ?
(१) अर्थविज्ञान
(२) शब्दकोश
(३) ध्वनिशास्त्रीय
(४) पदिम
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – १
४. इंग्रजी भाषा शिकविणारी तुमची सहाध्यायी वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते असे तुमच्या लक्षात येते. ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करते?
(१) व्याकरण भाषांतर
(२) संरचनात्मक मौखिक परिस्थिती
(३) थेट (Direct)
(४) श्रव्य-भाषिक
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – १
५. नेमका अर्थ मिळण्यासाठी फारसे तपशील न देता कमी शब्दांत नेमकी माहिती देता येण्याची क्षमता म्हणजे-
(१) प्रक्रिया लेखन
(२) नोंदी घेणे
(३) टिपण काढणे
(४) सारांशीकरण
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – ४
६. आवाजाच्या शैलीची कोणत्या पद्धतीने परिणाम-कारकरीत्या पारख करता येते ?
(१) शब्दांची निवड
(२) आवाजाचा सूर
(३) स्वरतंत्र (Vocals)
(४) आवाजाचा वेग
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – २
७. वर्गात बैठक व्यवस्था लवचीक असली पाहिजे. याचे कारण-
(१) यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक गट, जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होते.
(२) यामुळे विद्यार्थ्यांना हवी ती जागा हवी तेव्हा घेण्याचे स्वातंत्र्य मिळते.
(३) यामुळे शिक्षिकेला वर्गात समानता निर्माण करण्यास मदत होते.
(४) त्यामुळे मुलांना कायमस्वरूपी मित्रता निर्माण करता येणार नाही.
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – १
८. प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणत्या घटकावर विशेष भर दिला पाहिजे ?
(१) विरामचिन्हाचा वापर
(२) ओघवते वाचन
(३) समजून केलेले वाचन
(४) वर्णमालेतील अक्षर ओळखणे
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – ३
९. परिणामकरण संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?
(१) सतत फिरणे व हावभाव करणे
(२) तुमच्या मनात जे येईल ते सांगणे
(३) इतरांना अगोदर ऐकणे
(४) सतत इतरांना थांबवणे
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – ३
१०. इंग्रजी व्याकरण शिकविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते ?
(१) लिहिताना आणि बोलताना आपल्या विचारांना योग्य आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे.
(२) नियम पाठ करण्याची क्षमता वाढविणे.
(३) अभ्यासात गोडी निर्माण करणे.
(४) आपले मूळ विचार वृद्धिंगत करणे.
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – १
११. प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विषयाशी संबंधित मुद्द्यांवर लेखन करण्यास प्रवृत्त विकसित करताना शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कोणत्या केले पाहिजे ?
(१) धार्मिक मान्यता
(२) वैयक्तिक जीवन
(३) सामाजिक विषय
(४) राष्ट्रीय विषय
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – २
१२. प्रत्येक विद्यार्थ्यांतील तफावत ओळखून त्यांना योग्य ती मदत करण्याची तुमची इच्छा आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा तुम्ही वापर कराल ?
(१) निदानात्मक मूल्यमापन (Diagnostic Asse-ssment)
(२) समाकलित मूल्यमापन (Summative Assess-
ment)
(३) संस्कारक्षम मूल्यमापन (Formative Assess-
ment)
(४) सवंगड्यासोबत मूल्यमापन (Peer Assess-
ment)
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – १
१३. चॉमस्कीने असे मत मांडले आहे की, भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता ही आपल्या समान जैविक क्षमतेचे परिणाम आहे, ही क्षमता म्हणजे-
(१) भाषा प्राप्ती क्षेत्र (Language Acquire Domain)
(२) भाषा स्वीकारण्याची इच्छा
(३) भाषा आत्मसात करण्याचे साधन (Language Acquisition Device)
(४) भाषा रूपांतर स्तर (Language Adaptation
Degree)
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – ३
१४. भाषेत वापरला जाणारा सर्वांत लहान अर्थपूर्ण ध्वनी घटक कोणता ?
(१) स्वन
(२) रुपिम
(३) वाक्यव्यवस्था
(४) अर्थविज्ञान
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – १
१५. २ ते ३ महिन्यांच्या मुलांमध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. असे उच्चारण कशाचे उदाहरण आहे?
(१) बडबड (Babbling)
(२) ओरडणे
(३) एका शब्दाचे उच्चारण
(४) कुजबुजणे (Cooing)
या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक – १








