20 महत्वाचे मराठी वाक्यप्रचार marathi vakyaprachar 

20 महत्वाचे मराठी वाक्यप्रचार marathi vakyaprachar 

अंगाची लाहीलाही होणे – अतिशय संताप निर्माण होणे.

अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे.

अंग चोरणे – फारच थोडे काम करणे.

अंगवळणी पडणे – सवय होणे.

ऊर भरून येणे – गदगदून येणे.

कपाळ फुटणे – दुर्दैव ओढवणे.

कपाळमोक्ष होणे – मृत्यू येणे/अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे.

कपाळाला हात लावणे – हताश होणे, नाराजी दाखवणे.

कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.

कंठस्नान घालणे – शिरच्छेद करणे.

कंठाशी प्राण येणे – खूप कासावीस होणे.

कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे.

कंबर खचणे – धीर सुटणे.

काढता पाय घेणे – प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे.

कान उघाडणी करणे  – चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे.

कान उपटणे – कडक शब्दांत समज देणे.

कान टवकारणे – सावधपणे ऐकणे.

कान टोचणे – खरमरीत शब्दांत चूक लक्षात आणून देणे.

कान निवणे – ऐकून समाधान होणे

कान पिळने – अद्दल घडवणे

Leave a Comment