सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत sanagrim maryada vadhvinebabat 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत sanagrim maryada vadhvinebabat 

वाचा :

शासन निर्णय pdf download

(१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एफएनडी-१०६२-वी, दि.६.१२.१९६२.

(२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. मुंविनि-१०९९/प्र.क्र.५२/९९/विनियम, दि.२०.१०.१९९९.

(३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अग्रिम-१०.०५/प्र.क्र.१८/०५/विनियम, दि.२०.०६.२००५.

(४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०७/प्र.क्र.५८/०७/विनियम, दि.१९.१०.२००७.

(५) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०८/प्र.क्र.७०/०८/विनियम, दि.१५.५.२००९.

(६) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०९/प्र.क्र.४८/०९/विनियम, दि.१५.०९.२००९.

(७) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१०/प्र.क्र.१२/१०/विनियम, दि.१०.०५.२०१०.

(८) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अग्रिम-२०१२/प्र.क्र.३२/१२/विनियम, दि.१८.१०.२०१२.

(९) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१५/प्र.क्र.५७/१५/विनियम, दि.२६.१०.२०१५

(१०) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अग्रिम-२०१७/प्र.क्र.१२/१७/विनियम, दि.१८.०५.२०१७

प्रस्तावना –

अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र.१४२ (जे) अनुसार देण्यात येणाऱ्या सण अग्रिमाची रक्कम वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय pdf download

शासन निर्णय –

शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन १४,८००/-(रु.चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ₹१२,५००/- (रु. बारा हजार पाचशे फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहील.

२. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहील.

१. दिवाळी

२. रमझान ईद

३. ख्रिसमस

४. पारसी नववर्ष

५. संवत्सरी

६. रोश-होशना

७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती)

८. स्वातंत्र्य दिन

९. प्रजासत्ताक दिन

१०. डॉ. आंबेडकर जयंती

३. सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील.

४. हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

4. मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२ (जे) मध्ये योग्य ती सुधारणा यथावकाश करण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१८१०२३१६१८४७९७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

शासन निर्णय pdf download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment