सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २ री ते इयत्ता १२ वीपर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी जिल्हास्तरावरून सुरू करणेबाबत udise plus pranali second to twelve registration
संदर्भ : १) या कार्यालयाचे जा.क्र.MPSP/Samagra Shiksha/Computer २०२५-२६/२८९३ Dt. २५/०९/२०२५ रोजीचे पत्र.
२) केंद्र शासनाकडील दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या सूचना.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये केंद्रशासनाकडे इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत समाविष्ट नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Add करण्याची सुविधा मिळण्याकरिता विनंती करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने आज दि. २९ सप्टेंबर, २०२५ पासून केंद्र शासनाने जिल्हा स्तरावरून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत विद्यार्थी समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदरची सुविधा दि. १७ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत जिल्ह्यांचे लॉगिनमध्ये सुरू असणार आहे, त्यापूर्वी जिल्ह्यातील एक ही विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणाली बाहेर राहणार नाही, याची खात्री करून घेण्यात यावी. सोबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात येत आहे.











