जिल्हा अंतर्गत बदली कार्यमुक्ती आदेश online teacher transfer 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा अंतर्गत बदली कार्यमुक्ती आदेश online teacher transfer 

उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून निर्गमित पूरकपत्र, परिपत्रके इ. मार्फत वेळोवेळी प्राप्त निर्देशांचे पालन करून प्राथमिक शिक्षकांची विशेष संवर्ग शिक्षक भाग १, विशेष संवर्ग शिक्षक भाग २ (पती पत्नी एकत्रीकरण), बदली अधिकार प्राप्त शिक्षक, बदलीपात्र शिक्षक व विस्थापित शिक्षक (Eligible २) या संवर्गातून पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलवर पूर्ण झाली आहे. त्यानुसार बदली झालेल्या पुणे जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांची संगणक प्रणालीतील (OTT) यादी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून संदर्भ क्र. २ अन्वये प्राप्त झाली होती.

संदर्भ क्र.३ अन्वये विशेष संवर्ग शिक्षक भाग १, विशेष संवर्ग शिक्षक भाग २ (पती पत्नी एकत्रीकरण), बदली अधिकार प्राप्त शिक्षक, बदली पात्र शिक्षक व विस्थापित शिक्षक (Eligible २) या संवर्गातून बदलीच्या प्राप्त यादीतील ज्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली झालेली आहे अशा शिक्षकांना बदली झालेल्या शाळेवर शाळेवर हजर होण्याकरिता दिनांक १८/०९/२०२५ रोजी मध्यान्नोत्तर कार्यमुक्त करणे बाबत कळविणेत आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदरचे आदेश तात्पुरते थांबविणेत आले होते.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील संदर्भ क्र.३ च्या आदेशातील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना बदली झालेल्या नविन शाळेवर हजर होण्याकरिता दिनांक १३/१०/२०२५ रोजी मध्यान्नोत्तर कार्यमुक्त करण्यात येत आहे.

अटी व शर्ती :-

१) वरील परिशिष्टातील बदली झालेले शिक्षक हे बदली झालेल्या शाळेतून दिनांक १३/१०/२०२५ रोजी मध्यान्नोत्तर कार्यमुक्त होतील व बदली झालेल्या शाळेवर दिनांक ४/१०/२०२५ रोजी रुजू होतील. रुजू न झाल्यास, असे शिक्षक नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र राहतील. रुजू अहवाल संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी एकत्रित या कार्यालयास सादर करावा. २) तालुका बाहय बदली असल्यास प्रचलित पद्धतीने कार्यमुक्त / रूजू करण्यात यावे

३) बदली आदेशातील शिक्षकांनी या आदेशासोबत बदली पोर्टलवरून प्राप्त झालेला संगणकीय बदली आदेश जोडून पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक आहे.

४) सदर शिक्षकांचे दिनांक १३/१०/२०२५ रोजी पर्यंतचे वेतन संबंधितांच्या सध्याच्या मूळ शाळेवर आकारण्यात यावे.

५) दिनांक १४/१०/२०२५ पासून संबंधित शिक्षकांचे वेतन त्यांचे बदली झालेल्या शाळेवरच आकरण्याची दक्षता घ्यावी. ६) संबंधित शिक्षकाच्या बदलीने शाळा शून्य शिक्षकी होत असल्यास सदर शिक्षकांना कार्यमुक्त करू नये. ७) मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक म्हणून शाळेचा कार्यभार असणा-या शिक्षकांनी दिनांक १३/१०/२०२५ पर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे सर्व बाबींची पूर्तता करून हस्तांतरीत करावा. शाळेचा कार्यभार हस्तांतरीत झालेबाबत केंद्रप्रमुख यांनी खातरजमा करावी. विहीत मुदतीत कार्यभार हस्तांतरण न करणा-या मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक यांचे वेतन बंद करून त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई बाबत प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांनी सादर करावा.

८) बदली झालेल्या शिक्षकास बदली प्रवासभत्ता व वाटचाल कालावधी अनुज्ञेय नाही.

९) जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर भरलेली माहिती चुकीची आढळून आल्यास किंवा विशेष संवर्ग शिक्षक भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधून बदली घेतलेल्या एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आहे अशी बाब आढळल्यास शासन निर्णय दिनांक. १८ जून २०२४ मधील मुद्या क्र. ५.१०.५ नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

१०) बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचा-याने राजकीय दबाव वापरल्यास संबंधित कर्मचारी शासन निर्णय दिनांक १८ जून २०२४ मधील मुद्या क्र. ५.३ नूसार शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी. यादी सोबत जोडली आहे.

Related posts:

Leave a Comment