शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पे-बील प्रक्रीये मुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्यामुळे सदर प्रक्रिया दिवाळी नंतर लागू करणेबाबत shalartha pranali 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पे-बील प्रक्रीये मुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्यामुळे सदर प्रक्रिया दिवाळी नंतर लागू करणेबाबत shalartha pranali 

आपले पत्र दिनांक १४/१०/२०२५. संदर्भ :

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सद्यस्थितीत शालार्थ प्रणालीवर संचमान्यते मधील मान्य पदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी इंटिग्रेशन प्रक्रिया सुरु आहे. तथापि राज्यातील अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून वेतन पथकाकडे सादर होणाऱ्या देयकासंदर्भात संचमान्यतेमधील मान्य पदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे जुळल्यास सदरील देयक वेतन पथक स्तरावर मान्य होवून कोषागार कार्यालयाकडे पुढील प्रक्रियेकरीता सादर करण्यात येते. संचमान्यतेमधील मान्य पदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे न जुळल्यास अतिरिक्त पदासंदर्भात निर्णय घेणेकरिता व या कार्यरत पदांच्या वेतनास मान्यता देणेकरिता सदरील देयक संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), यांचे लॉगिनला उपलब्ध होते. अशा देयकास मान्यता देण्याची सुविधा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), यांना देण्यात आलेली आहे. या प्रणालीचा प्रभावी उपयोग सुरु आहे. इंटिग्रेशन प्रक्रिया ही संचमान्यता व शालार्थ प्रणाली च्या कामकाजाचा हा एक भाग आहे. यामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता येण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या प्रणाली बाबत सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), व वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक/माध्यमिक), यांना देण्यात आले आहे. प्राप्त तक्रारीबाबत वेळेत मार्गदर्शन/सूचना व आवश्यकतेनुसार प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

संचमान्यता शालार्थ प्रणालीवर इंटिग्रेट करणे व तद्नंतर वेतन अदा करणे ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया असून त्यामुळे नियमित वेतन अदा करण्यास कोणतीही अडचण उदभवणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment