शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करणे ayushyaman bharat card yojana
संदर्भ१. मा. सचिव २ सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र क्र. PHD/३७/२०२५-MJPJAY/AB-PMJAY
दि. १३.०८.२०२५
२. जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांचे पत्र क्र जिशचिसिं/ MJPJAY/आ.का/१५०९४-९७/२०२५-
२६ दि. ३०.१०.२०२५
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत. यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड Beneficiary Login मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
२. वरिल सूचनानुसार दि. १६ ऑगस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.
३. आता संदर्भ २ च्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाजकल्याण कार्यालय इ. ठिकाणी शिबीरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे.
४ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांत सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचा-यांसह) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित कराव्यात. अशा कर्मचा-यांसाठी Beneficiary लॉगीनद्वारे कार्ड निर्माणाकरीता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजीत करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल सोबात जोडलेल्या प्रपत १ मध्ये या कार्यालयास सादर करावा अशी विनंती आहे.








![Inviting online Application Form for National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/02/Screenshot_2026_0208_175316-150x150.jpg)
