100+ मराठी वाक्यप्रचार अर्थ व वाक्यात उपयोग marathi vakyaprachar artha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

100+ मराठी वाक्यप्रचार अर्थ व वाक्यात उपयोग marathi vakyaprachar artha 

➡️घाम जिरवणे – कष्ट करणे

शेत‌करी शेतात घाम जिरवतात

➡️धोकंपट्टी करणे – पाठांतर करणे परीक्षा जवळ येताच

राजू घोकंपट्टी करू लागला

➡️तपास लागण – सुगावा लागणे

पोलीसाना चोरांचा सुगावा लागला

➡️फरशा पाडणे – संपवणे

वाधाने हरणाचा फडशा पाडला

➡️धूम ठोकणे – पळून जाणे

समोर पोलिस पाहताच चोराने धूम ठोकली

➡️आभाळ कोसळणे -खूप मोठे संकट येणे.

महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्याऱ्यांवर आभाळ कोसळले

➡️चाहूल लागणे – कुनोसा घेणे

आपल्यामागे कोणीतरी येत आही याची प्रियाला चाहूल लागती.

➡️आहूती देणे- बलिदान देणे

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शूर क्रांतीकारांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली.

➡️तारांबळ होणे – खूप गडबड उडणे

घरी अचानक पाहुणे येताच आईची तारांबळ झाली.

➡️गढून जाणे – गुंग होणे

तनुजा चित्र काढण्यात नेहमी गढून जाते.

➡️पारा चढणे – राग येणे

माझ्याकडून एखादी चूक झाली तर बाबांचा पारा चढतो.

➡️पोटात कावळे ओरडणे – खूप भुक लागणे.

जेवायला थोडा उशिर झाला तर राहुलच्या पोटात कावळे ओरडतात

➡️अंगावर काटा येणे – खूप भीती वाटणे.

अचानक समोर साप पाहताच विराजच्या अंगावर काटा आला.

➡️डोळा लागणे -झोपणे

सकाळ पासून खूप काम केल्याने आईचा डोळा लागला.

➡️अभिवादन करणे – नमस्कार करणे

आर्यनने आई-बाबांना अभिवादन केले.

➡️बेत आखणे- योजना आखणे

आईने आज श्रीखंड – पूरीचा बेत केला.

➡️हातभार लावणे – मदत करणे.

रविवारी मी आईला कामात हातभार लावला.

➡️अंगवळणी पडणे – सवय होणे

सकाळी दररोज लव‌कर उठणे हे नीताच्या अंगवळणी पडले

➡️ झुंज देणे – लढा देणे

भारतीय सैन्यांनी शत्रूशी झुंज दिली

➡️अधीर होणे – उत्सूक होणे.

आईला भेटण्यासाठी अजय अधीर झाला.

➡️कानाडोळा करणे – दुर्लक्ष करणे

आईने यश च्या चुकांकडे कानाडोळा केला.

➡️कंबर कसणे – तयार होणे

दिक्षा ने स्पर्धा परिक्षेसाठी कंबर कसली.

➡️उदास होणे – खिन्न होणे. 

राजला कमी गुण मिळाल्याने तो उदास झाला

➡️उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे

अमोलची फूटबॉल मधील आवड पाहून बाबांनी त्याला उत्तेजन दिले.

➡️उंबरठा ओलांडणे – मर्यादा सोडणे

आईबाबाचा अपमान करून अजय ने उंबरठा ओलांडला

➡️डोळ्याचे पारणे फिटणे – प्रसन्न नेणे,

राहुलला शिष्यवृती मिळाल्यावर बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

➡️नाव मिळवणे- किर्ती मिळवणे

शाम ने अतिशय कष्ट करून नाव मिळवलेले

➡️पाठ थोपटणे – शाबासकी देणे

रुपालीने केलेला अभ्यास पाहून सरांनी तिची पाठ थोपटली.

➡️पोटाशी धरणे – मायेने कुशीत घेणे.

आई आपल्या छोट्या बाळाला पोटाशी धरते.

➡️भारी वाटणे – चांगले वाटणे.

राणी च गाणं मला खूप भारी वाटलं.

➡️मुग्ध होणे – मोहित होने

सायलीच नृत्य पाहून सर्व प्रेक्षक मुग्ध झाले.

➡️धुळीस मिळणे- नष्ट होणे

मुसळधार पावसामुळे सर्व पिक धुळीस मिळाली.

➡️वीरगती प्राप्त होणे – देशासाठी लढताना मरण पावणे

युद्धात लढताना भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली.

➡️संकल्प करणे – निश्चय करने

स्वप्निल ने रोज व्यायाम करण्याचा संकल्प केला.

➡️हातावर तुरी देणे- पुसवून पळून जाणे.

बघता बघृता चोरांनी पोलीसाच्या हातावर तुरी दिली.

➡️प्रभावित होणे – छाप पडने

महात्मा गांधीजींचे देशकार्य पाहून लोक प्रभावित झाले.

➡️मात करणे – विजय मिळवणे

कांचनने कर्करोगावर मात केली

➡️अर्धपोटी राहणे – उपाशी राहणे

गरिबीमुळे गोपालक कधी कधी अर्धपोटी राहतो

➡️कान धरणे – माफी मागणे.

आईने चूक समजावून सांगताच महेशने कान धरले.

➡️नाक मुरडणे – नाराजी व्यक्त करणे.

शीतलने मैत्रिणीचे नवीन घड्याळ बघताच नाक मुरडले.

➡️कनखर बनने – काटक बनणे,

दूररोज व्यायाम केल्यामुळे अदित्यचे शरीर कणखर बनाये.

➡️दिलासा मिळणे – धीर मिळणे

रामला संकटसमयी त्यांच्या मित्रांनी मदत केली त्यामुळे त्याला दिलासा मिळाला

➡️ओढताण करणे – कष्टदायक धावपळ होणे

शेतातले काम व किराणा दुकान यामध्ये रामची ओढाताण होते.

➡️खंत वाटणे – वाईट वाटणे

गावामध्ये शाळा नसल्यामुळे गावक-यांना खंत वाटत होती.

➡️नाव उंच करणे – कीर्ती संपादन करणे

किशोरने खूप अभ्यास करून स्वतःचे व आई- वडिलांचे नाव उंच केले

➡️कसूर न करणे – चूक न करणे, दुर्लक्ष न करतो.

गीता अभ्यासामध्ये कसलीही कसूर न करतात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती.

➡️मार्ग काढने- वाट काढणे रस्ता शोधने

चोराचा माग काढत काढत पोलीस चोरापर्यंत पोहचले.

➡️सावध करणे – भान देणे

चोरांची चाहूल लागताच कुत्र्याने भुंकून आपल्या मालकाला सावध केले

➡️गुडघे टेकणे – शरण येणे

शिवाजी महारांजापुढे मुघलांनी गुडी टेकले होते.

➡️प्रतिक्षा करणे – वाट पाहणे

मामाच्या गावी जाण्यासाठी आम्ही बसची प्रतिक्षा करत होते.

➡️तोंड देणे – सामना करणे

आपले सैनिक कोणत्याही परिस्थितीला सहजपणे तोंड देतात.

➡️अभिमान वाटणे – गर्व वाटणे

परी 12 वीच्या परिक्षेत राज्यात पहिली आल्यामुळे तिचा सर्वांना अभिमान वाटत होता.

➡️कायापालट होणे – पूर्णपणे बदलणे

नवीन आलेल्या सरांनी शाळेचा कायापालट केला.

➡️जन्माचे सार्थक होगे – कार्य यशस्वी होणे

स्पर्धा परिक्षेत सीमाने यश मिळवले त्यामुळे तिच्या जन्माचे सार्थक झाले.

➡️दशा होने – वाईट अवस्था होने.

शेजारच्या आजीची खूप द‌शा झाली होती.

➡️भुरळ पडणे- आकर्षित करणे.

बागेतील फुलांची मला भुरळ पडली.

➡️रडकुंडीस येणे -अतिशय त्रास होणे

घरातील काम करताना बाबा रडकुंडीस आल.

➡️तलवार गाजवणे – पराक्रम करणे.

पानिपतच्या लढाईत मराठ्यानी तलवार गाजवली.

➡️कान टोचणे – समजावून सांगणे

ताईने अभ्यासाबद्‌दल समर्थचे कान टोचले.

➡️रक्ताचे पाणी करणे – खूप मेहनत करणे

स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी मुले रक्ताचे पाणी करतात.

➡️खंड पडणे – मध्येच थांबणे

आजारी असल्यामुळे राणीच्या शिक्षणात खंड पडला.

➡️तत्पर असणे – तयार असणे

संघ नेहमी इतरांना मदत करायला तत्पर असतो.

➡️गौरव करणे – सन्मान करणे

प्रियाने परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचा गौरव करण्यात आला.

➡️स्वप्न साकार करणे – स्वप्न प्रत्यक्षात येणे

भारतीय क्रिकेट संघाने वन-डे मध्ये विश्वविजेते होण्याचे स्वप्न साकार केले.

➡️गुण गाणे – स्तुती करणे.

शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे नेहमी गुण गातात.

➡️डोळे पाणवणे – रडू येणे

राधा सासरी निघाल्यामुळे आईचे डोळे पाणावले.

➡️सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे

पंकजाला नोकरी मिळाल्यापासून त्याच्चा कुटुंबाचे सोन्याचे दिवस आले.

➡️हस्तगत करणे – ताब्यात घेणे, मिळवणे

कोमल ने अगदी कमी वेळात नृत्याची कला हस्तगत केली.

➡️बारा वाजणे – पूर्ण नाश होणे

वाईट संगतीमुळे समीर चे बारा बाजले

➡️वटणीवर आणने – ताळ्यावर आणने

आईने आपल्या बंड मुलाला वठणीवर आणते.

➡️विडा उचलणे – निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे

पोलिसांनी चोरांचा बीमोड करण्याचा विडा उचलला.

➡️दाद मागणे – तक्रार करून न्याय मागणे

आपल्यावर होणाया अन्यायाविरुद्ध सर्वांनी दाद मागीतली पाहिजे.

➡️दात ओठ खाणे – द्वेषाची भावना दाखवणे.

आमच्या घराजवळील दोन शेजारी नेहमी एकमेंकाना बघून दात ओठ खातात.

➡️नाकावर राग असणे – लवकर चिडणे

माझ्या लहान बहिणीच्या नाकावर नेहमी राग असतो.

➡️पाठ दाखवणे – पळून जाणे

वाईट मित्र संकट‌काळी नेहमी पाठ दाखवतो

➡️जिव थोडा थोडा होणे – अतिशय काळजी वाटणे

शाळेतून यायला उशीर झाल्यास आपल्या मुलांसाठी आईचा जीव थोडा थोडा होतो.

➡️डोळ्यात धूळ फेकणे – फसवनुक करणे

आरोपी पोलिसांच्या डोळ्यात मूळ फेकून धूळ फेकून निघून गेला

➡️खडे फोडणे-दोष देणे

दुसऱ्याच्या नावाने खंडे फोडण्यापेक्षा स्वत: मेहनत करावी.

➡️आगीत तेल ओतणे – भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

काही लोग आगीत तेल ओतण्याचे काम करतात.

➡️प्रेरणा मिळणे – स्फूर्ती मिळणे

शाळेतील शिक्षकांना बघून सर्वांना प्रेरणा मिळते.

➡️पुढाकर घेणे – नेतृत्व करणे

घरील मोठी व्यक्ति प्रत्येक कार्यात पुढाकार घेते.

➡️तगादा लावणे – पुन्हा पुन्हा मागणी करने

लहान मुल प्रत्येक गोष्टीची तगादा लावतात…

➡️बळ लावणे – शक्ति खर्च करणे.

निर्थक कामात बळ लावू नये.

➡️कानोसा घेणे – अंदाज घेणे

रात्री कूत्र्याच्या भुकण्याचा आवाज ऐकून पोलिसांनी कानोसा घेतला

➡️कोसळणे – जोरात पडणे

अचानक आलेल्या वादळी वाऱ्याामुळे आणी पावसामुळे झाडे कोसळली

➡️पारा चढणे – खूप रागावणे

परीक्षेत अक्षयला, कॉपी करताना पाहून संराचा पारा चढला.

➡️श्री गणेशा होणे – आरंभ होणे,

सरकार दरबारी बऱ्याच पाठपुराव्यानंतर अखेरीस गावातील रस्ता दूरुस्तीच्या कामाचा श्री गेणशा झाला.

➡️ओढाताण होणे – धावपळ होणे

लहान मुलांची ट्युशन घेऊन कॉलेजला जाणे त्यामुळे कामाची फार ओढाताण होते.

➡️सांभाळ करणे – पालन पोषण करणे

आई – वडील कामावर गेल्यावर राहुल चे आजी-आजोबा त्याचा सांभाळ करतात

➡️खंत वाटणे – वाईट वाटणे

राहुल ची इच्छा असूनपण पैसे नसल्याने कविताची मदत करु शकला नाही म्हणून त्याला खंत वाटली.

➡️कमीपणा वाटणे – अपमान वाटतो

वर्गातीत मुलांसमोर राज ला शिक्षकांनी शिक्षा केल्यामुळे राजला कमीपणा वाटला,

➡️आवर्जुन पाहणे – मुद्दाम पाहणे

कोल्हापूरला भेट दिल्यानंतर रंकाळा तलाव आवर्जून पहावा.

➡️आव्हान देणे – संघर्षाला आमंत्रण देणे

राजू ने संदीपला शर्यतीसाठी आव्हान दिले.

➡️उदरनिर्वाह पुरणे – उपजिवीका करने

राजू शेतित काम करून उदरनिर्वाह करतो

➡️इनाम देणे – बक्षीस देणे.

कामगारांचे सर्वोतम काम पाहून मालकाने कामगारांना इनाम दिले.

➡️आकाश ठेंगणे वाटणे – खूप आनंद होणे

राजू शाळेत पहिला आलेला पाहून आई-बाबांना आकाश ठेंगणे वाटले.

 

 

Related posts:

Leave a Comment